राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच आपल्या वक्तव्यासाठी प्रसिद्धी झोतात असतात. राजकारणाचं व्यासपीठ असो व् पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं असो, अजित पवार (ajit pawar) हे नेहमीच आपल्या बोलीने अनेकांचे लक्ष वेधून घेतात. काही वर्षांआधी अजित पवार यांनी सोलापूरातील एका सभेमध्ये पाणी नसल्याने काय मुतू का? असा मिश्किल प्रतिसवाल केला होता. तो अपेक्षितही नव्हता. अशातच आता अजित पवार यांनी पत्रकारांना दादा पादा पादा…असे उलट उत्तर दिलं होतं. यावेळी सर्वत्र हशा पिकला होता. दरम्यान ही पुनरावृत्ती पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. एका सभेमध्ये अजित पवार यांनी खराडवाडी गावातील कॉलेजचा उल्लेख केला होता.या कॉलेजमध्ये आता पोरं कोणी आणायची असा सवाल अजित पवार यांना केला असता, अजित पवार उत्तरले आणि म्हणाले की, ‘ माझं वय झालं नाहीतर मीच आणली असती’; असं म्हणत अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
बारामतीमध्ये अजित पवार ग्रामपंचायत विजयी झालेल्या सरपंचांच्या भेटीसाठी गेले असता, त्या ठिकाणी सभा झाली. यावेळी एका कार्यकर्त्याने खराडवाडीला मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव मांडल्याबाबतचा अजित पवार यांनी किस्सा सांगितला. त्यानंतर त्या ठिकाणी मुलं अर्थातच विद्यार्थी कुठून आणता येतील? असा सवाल उपस्थित केला असताना अजित पवार यांनी जशासं तसं मात्र मिश्किल उत्तर दिलं आहे. यावर संपूर्ण सभेमध्ये हशा पिकला आहे.
हे ही वाचा
मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगेंचं उपोषण, तारीख ठरली
बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या; ईव्हीएम असेल तर सर्व मुमकीन म्हणत संजय राऊतांचा टोला
सलमान खानची अभिषेकला जादू की झप्पी; ऐश्वर्याच्या डोकेदुखीत वाढ?
यावर अजित पवार म्हणाले की, ‘आता माझं वय झालं आहे नाहीतर पोरं ही मीच आणली असती, असं म्हणत अजित पवार यांनी भरसभेमध्ये हास्यास्पद वातावरण तयार झालं. मग असं केलं तर मला चिडायला येतं. त्यासाठी मी डोकं शांत ठेऊनच काम करत असतो, असं म्हणत अजित पवारांनी वक्तव्य केलं आहे. त्याची चर्चा आता राज्यामध्ये पाहायला मिळत आहे.
वडिलांच्या नावापुढं लागणार आईचं नाव
महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वाने महिलांसाठी महिला धोरण जारी करण्यात आलं आहे. आतापर्यंत आधी मुलाचे \ मुलीचे नाव त्यानंतर आपल्या वडिलांचे आणि त्यानंतर आपले आडनाव पाहिलं आहे. मात्र आता या धोरणामुळे आपल्या वडिलांच्या नावाच्या आधी आईचे नाव लावण्यात येणार असल्याचे धोरण जारी करण्यात आलं आहे. म्हणजेच आधी मुलाचे त्यानंतर आईचे तसेच त्यानंतर वडिलांचे आणि शेवटी आडनाव असणार आहे.