27.8 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयअमोल कोल्हेंविरोधात उमेदवार निवडून दाखवील; अजित पवारांचं ओपन चॅलेंज

अमोल कोल्हेंविरोधात उमेदवार निवडून दाखवील; अजित पवारांचं ओपन चॅलेंज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे सरपंचांची भेट घेतली होती. त्यावेळी विद्यार्थी आणण्यासाठी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा ही राज्यभर आहे. अशातच आता अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे याचं नाव न घेता ओपन चॅलेंज दिलं आहे. माध्यमांशी बोलत असताना, अजित पवार यांनी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी एका नेत्याला खासदार बनवलं असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्याविरोधात उभा राहणाऱ्या नेत्याला मीच निवडून देणार असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

काय म्हणाले अजित पवार?

मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी एका नेत्याला खासदार केलं. मात्र आता त्याच्याविरोधामध्ये मीच उमेद्वार देणार असून त्याला निवडून आणणार असल्याचं अजित पवार म्हणाले असून एक खुलं आव्हान आता अजित पवार यांनी दिलं आहे. ते चांगले वक्ते आहेत मान्य आहे, पण तरीही मी त्यांच्याविरोधातील उमेद्वार निवडून आणणार असल्याचं चॅलेंज दिलं आहे. ज्यांना माझ्या बाजूने यावंसं वाटात आहे त्यानी माझ्या बाजूने यावं. ज्यांना दुसऱ्या बाजूने जायचं आहे त्यांनी तिकडं जावं, असं अजित पवार म्हणाले आहेत.

हे ही वाचा

अजित पवार म्हणाले, आता माझं वय झालं नाहीतर पोरं आणली असती

मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगेंचं उपोषण, तारीख ठरली

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या; ईव्हीएम असेल तर सर्व मुमकीन म्हणत संजय राऊतांचा टोला

काहीजण दोन्ही बाजूला दिसतात

अजित पवार आणि शरद पवार असे राष्ट्रवादीचे दोन गट झाले आहेत. यामध्ये अजित पवार गटाकडे काही नेते आणि आमदार आहेत तर काही शरद पवार गटाकडे काही आमदार आहेत. मात्र अशातच माध्यमांनी काही नेते दोन्ही बाजूंनी दिसतात? असा प्रश्न केसा असता, यावर अजित पवार उत्तरले म्हणाले ‘असुद्या ना मी सांगायचं काम केलं आहे. बघूया काय फरक दिसत आहे. माझ्या दृष्टीने जे मला योग्य वाटतं त्या बाजूने मी भूमिका मी घेत आहे.

कोणाला पदयात्रा सुचते तर कोणाला संघर्षयात्रा सुचते

माध्यामशी बोलत असताना अजित पवार म्हणाले, अमोल कोल्हेचा नामोल्लेख न करता याआधी ते अनेकदा म्हणाले आहेत की, माझ्या मनोरंजन क्षेत्राच्या कामावर परिणाम होत आहे. छ. शिवाजी महाराज यांचा सिनेमा फरसा चालाल नाही. मी राजीनामा देतो, असं ते म्हणाले होते. मी हे खरं तर बोलून दाखवणार नव्हतो मात्र मी हे बोलून दखवलं. कोणी संघर्ष यात्रा काढतंय कोणी पदयात्रा काढत आहे, काढू द्या लोकशाही आहे. असं म्हणत अजित पवार यांनी अमोल कोल्हेंचं नाव न घेता टीका केली असून संघर्ष आणि पदयात्रेवर निशाणा साधला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी