28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयमहापालिका निवडणुकीसाठी मनसे सज्ज; अमित ठाकरे यांचा नाशिक दौरा

महापालिका निवडणुकीसाठी मनसे सज्ज; अमित ठाकरे यांचा नाशिक दौरा

टीम लय भारी

मुंबई:- येत्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसेची जोरदार तयारी सुरु आहे. मनसे नेते अमित ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर आहेत, बुधवार (ता.28) दुपारपर्यंत ते नाशिकमध्ये पोहोचणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आढावा घेणार आहेत (Amit Thackeray is touring Nashik for municipal elections today).

गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे पक्षात चांगलेच अॅक्टिव्ह झाले आहेत. पक्षांतील नेते-कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन ते विविध विषय समजून घेत आहेत. त्यातच आता महापालिका निवडणुका असल्याने अमित ठाकरे यांचा अॅक्टिव्हनेस वाढला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिक दौरा केला होता. त्यानंतर आज पुन्हा ते नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत (Amit Thackeray activism has increased due to municipal elections).

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी देशाची माफी मागावी; नाना पटोले

पूरग्रस्त भागात राजकीय दौरे नको; शरद पवार

अमित ठाकरे यांचे बुधवार (ता.28) दुपारी नाशिक शहरात आगमन होईल. त्यानंतर ते पक्षाती नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील, चर्चा करतील. शहरातील एकंदर राजकीय परिस्थिती तसेच विविध वार्डांची स्थिती, असा एकंदर आढावा घेऊन त्याचा अहवाल ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवणार आहेत.

अमित ठाकरे यांच्या नाशकामधल्या फेऱ्या वाढल्या आहेत. त्यांनी नाशिक शहरात जातीने लक्ष घालायला सुरुवात केली आहे. नाशिक महापालिकेची निवडणूक तोंडावर असल्याने ते कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्या दृष्टीने तयारी करत आहेत. म्हणजेच अमित ठाकरेंवर नाशिक महापालिकेची जबाबदारी सोपविण्यात आली, अशी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे (Amit Thackeray was given the responsibility of Nashik Municipal Corporation).

कोकणासाठी कटू निर्णय घेण्याची गरज; विजय वडेट्टीवार

Maharashtra Navnirman Sena asks Bollywood stars to help flood-affected people

राज ठाकरे यांचा पुणे दौरा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल ठाण्यात पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. मंगळवार (ता.27) सकाळी राज ठाकरे मुंबईवरुन 11.15 च्या सुमारास ठाण्याकडे रवाना झाले. तिथली बैठक आटपून राज ठाकरेंनी सायंकाळच्या सुमारास पुण्याच्या दिशेने कूच केले.

राज ठाकरे 2 ऑगस्टपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असतील. राज ठाकरे यांनी गेल्याच आठवड्यात पुणे दौरा केला होता. राज ठाकरेहे 19, 20 आणि 21 जुलै अशा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरेंचा पुढचा पुणे दौराही ठरला होता. आठ दिवसांनी म्हणजे 30 जुलैला राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी दिली होती (Raj Thackeray will visit Pune again).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी