29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeटॉप न्यूजभारतीय महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रावर होणार कारवाई

भारतीय महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रावर होणार कारवाई

टीम लय भारी

मुंबई :- भारताची महिला टेबल टेनिसपटू मनिका बात्राला ऑलिम्पिकमध्ये खेळताना पराभव पत्करावा लागला. परंतु तिच्या बेशिस्त वर्तनामुळे आता तिच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे (Action will be taken against table tennis player Manika Batra).

काय आहे हे प्रकरण

मनिका जेव्हा ऑलिम्पिकमध्ये खेळत होती तेव्हा तिने राष्ट्रीय प्रशिक्षकांची मदत घेणे गरजेचे होते, परंतु तिने त्यांची मदत घेतली नव्हती. ती तिच्या खासगी प्रशिक्षक यांना टोकीयोमध्ये घेऊन आली होती. पण तिच्या खासगी प्रशिक्षकांना आयोजकांनी खेळाच्या ठिकाणी प्रवेश दिला नाही.

पूरग्रस्त भागात राजकीय दौरे नको; शरद पवार

चिपळूण शहर स्वच्छतेसाठी 2 कोटी रुपयांच्या निधीची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

सौम्यदीप रॉय हे भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत. 2016 साली त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत सांघिक गटात सुवर्णपदक पटकावले होते. त्याचबरोबर त्यांना अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. मनिकाचे खासगी प्रशिक्षक हे समन्वय परांजपे हे आहेत. मनिका तिचे खासगी प्रशिक्षक परांजपे यांना स्वतः सोबत ऑलिम्पिकमध्ये घेऊन गेली होती. परंतु आयोजकांनी परांजपे यांना मानिका बरोबर सराव करण्याची संधी दिली नाही. तसेच त्यांना स्पर्धेच्या ठिकाणी सुध्दा प्रवेश दिला नाही. मनिकाने स्पर्धा सुरू असताना राष्ट्रीय प्रशिक्षक रॉय यांची मदत घ्यायला हवी होती परंतु तिने तसे केले नाही (Manika had to enlist the help of national coach Roy when the competition started).

Action will be taken against table tennis player Manika Batra
मनिका बत्रा

कोकणासाठी कटू निर्णय घेण्याची गरज; विजय वडेट्टीवार

Olympic Games Tokyo 2020: टेबल टेनिस महासंघ ने दी मनिका बत्रा के खिलाफ कार्रवाई की धमकी, जानिए क्या है कारण

या सर्व प्रकरणावर भारतीय टेबल टेनिस महासंघाचे महासचिव अरुण कुमार बॅनर्जी म्हणतात, “मानिकाने शिस्त पाळली नाही. तिच्या या बेशिस्त वर्तनामुळे तिच्यावर कारवाई केली जाईल. जेव्हा स्पर्धा सुरू होती तेव्हा तिने राष्ट्रीय प्रशिक्षकांना आपल्याजवळ बसवून त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला हवे होते. टेबल टेनिस महासंघाची बैठक होणार आहे या बैठकीमधये मनिकावर कोणती कारवाई करायची याचा निर्णय घेतला जाईल.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी