29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयअरविंद केजरीवाल नंतर कोण

अरविंद केजरीवाल नंतर कोण

अरविंद केजरीवाल यांना मध्य घोटाळा प्रकरणी ईडीनेे अटक केली. तरीही ते तुरुंगातून सरकार चालवतील असा विश्वास त्यांची विश्वासू मंत्री अतिशी यांनी सांगितले. सोमनाथ भारती यांनी सुद्धा कोणताही कायदा तुरुंगातून सरकार चालवण्यास बंधन आणत नाही  असं सांगितलं.

 

अरविंद केजरीवाल यांना मध्य घोटाळा प्रकरणी ईडीनेे अटक केली. तरीही ते तुरुंगातून सरकार चालवतील असा विश्वास त्यांची विश्वासू मंत्री अतिशी यांनी सांगितले. सोमनाथ भारती यांनी सुद्धा कोणताही कायदा तुरुंगातून सरकार चालवण्यास बंधन आणत नाही  असं सांगितलं.

कोणा कोणाची नावे आहेत चर्चेत
अरविंद केजरीवाल यांच्यानंतर त्यांच्या मागे दिल्ली सरकारमधील मंत्री अतिसी सौरभ भारद्वाज व त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्याकडे सुद्धा नेतृत्वम्हणून सर्वांच्या नजर आहेत.

कशासाठी झाली अटक

2023 च्या नोव्हेंबर महिन्यात अरविंद केजरीवाल यांना ईडीने समन्स बजावला होता. दिल्ली सरकारच्या पूर्वीच्या उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात हा समन्स बजावण्यात आला होता. अरविंद केजरीवाल यांनी सलग तीन वेळा ईडीच्या कार्यालयात हजेरी लावण्याचे टाळले. केंद्र सरकारच्या तपास संस्था गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षाच्या मागे आहेत

कथिथे मद्य घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली.यापूर्वी विजय नायर अभिषेक बोईमपल्ली समीर महेंद्र पीस शरदचंद्र विनाय बाबू अमित अरोरा गौतम मल्होत्रा रागाव मंगूता राजेश जोशी अमंडन अरुण पिल्ले मनीष सिसोदिया दिनेश अरोरा संजय सिंग के कविता यांना अटक करण्यात आली आहे.

काय म्हणाले पंजाबचे मुख्यमंत्री
पंजाबचे मुख्यमंत्री भगवत सिंह मान म्हणाले ही त्यांना अटक करून केजरीवाल विचार कधी संपणार नाही.उलट आप देशात वाढणार आहे.भाजपला मुख्यविरोधी पक्ष आप आहे त्यामुळे त्यांनाा भीती वाटत आहे.
केजरीवाले विचार कैद करता येत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात केवळ एका व्यक्तीला घाबरतात ती व्यक्ती म्हणजे अरविंद केजरीवाल होय.
फिजिवली या विचारायला कैद करता येत नाही असं आम आदमी पार्टीची सचिव धनंजय शिंदे यांनी म्हटले आहे.

दीड वर्षांपासून चौकशी

सीबीआय आणि ईडीकडून मद्य घोटाळ्याची सुमारे दीड वर्षांपासून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात नाव असलेल्या लोकांची केंद्रीय तपास यंत्रणाकडून चौकशी करत आहे. याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये आपचे खासदार संजय सिंह यांनाही अटक करण्यात आली होती.

संविधानिक पद्धतीनं आंदोलन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ  संपूर्ण देशभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र येणार आहेत. संविधानिक पद्धतीनं आंदोलन करणार आहेत.  लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या सर्व जनतेला आम आदमी पक्षाच्या या संविधानिक आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं पक्षाकडून विनंती करण्यात आलीय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी