33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रलोकसभा निवडणूक लढवण्याबाबत शरद पवार जरा स्पष्टच बोलले

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत शरद पवार जरा स्पष्टच बोलले

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार (sharad pawar) स्वतः पुणे किंवा माढातून (pune or madha lok sabha) निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता स्वतः शरद पवारांनी (sharad pawar) या चर्चांना पूर्णविराम देत, मी यापुढे कधीच निवडणूक लढवणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. शरद पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. यासोबत त्यांनी माढ्याच्या जागेसाठी कोणाला उमेदवारी मिळावी यावरही भाष्य केलं. (sharad pawar says i will never contest elections pune or madha lok sabha)

पुण्यातून असो अथवा माढ्यातून मी आता कधीच लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी पुणे, माढा आणि सातारा या लोकसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. पण आतापर्यंत मी १४ निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या आहेत. आता निवडणूक लढणार नाही, असा पुनरुच्चार पवार यांनी यावेळी केला.

केजरीवाल जेलमधूनच सरकार चालवणार? कायदा काय सांगतो?

तसेच, माढ्याची जागा महादेव जानकर यांनी लढावी, ही माझी वैयक्तीक मागणी आहे. मात्र सगळ्यांनी ऐकली पाहिजे. ज्योती मेटे यांच्यासंदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही. आमच्याकडे आणखी लोक येतील, महायुतीची जागा निश्चित झाल्यावर आणखी माणसं येतील, असं शरद पवार यावेळी म्हणालेत.

अरविंद केजरीवालांच्या अटकेवर पवार काय म्हणाले?

विरोधी पक्षाच्या लोकांवर ईडी किंवा इतर संस्थांचा वापर होत आहे. केजरीवाल यांना वाटत होतं की काहीतरी होईल, केजरीवाल यांना अटक केली. त्यांनी धोरण तयार केलं तो त्यांचा अधिकार आहे. त्यांचे धोरण चुकले असेल तर लोकांसमोर जावा, कोर्टात जावा पण तसे न करता त्यांना अटक केली हे चुकीचं आहे.

केजरीवालांच्या अटकेनंतर शरद पवारांचे मोठं वक्तव्य…

मुख्यमंत्री यांना अटक करण्यापर्यत हे सरकार पोहोचले आहे. केजरीवाल यांना अटक झाली याचा अर्थ केजरीवाल यांच्या 100 टक्के जागा निवडून येतील. मागच्यावेळी त्यांच्या 2 जागा आल्या आता तेवढ्या देखील येणार नाही. जे आणिबाणीत झालं नाही ते आता होतं आहे. इंडिया म्हणून त्यांना पाठीशी आहे. लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम सुरू आहे. 80 ते 90 टक्के लोकांना केजरीवाल यांना लोकांची पसंती आहे. असं मत पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी