30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयआज विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन वातावरण तापण्याची शक्यता

आज विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन वातावरण तापण्याची शक्यता

टीम लय भारी
मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे  शेवटचे दोन दिवस उरले आहे. आज आणि उद्या दोन दिवसात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सरकारला राज्यपालांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवार देणार की निवडणूक बिनविरोध होणार याचाही सस्पेन्स कायम आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राज्यपाल  सरकारला अडचणीत आणण्यासाठी काही वेगळा निर्णय घेणार का याकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं लक्ष लागलं आहे. तर, भाजप विधानसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवार देणार का? असा देखील प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आहे.( Assembly Speaker election, possibilities of arguments to be happen)

राज्य सरकारनं अध्यक्षपदाचा निवडीचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवलेला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर प्रक्रिया पुढं जाईल, अशी माहिती आहे. मात्र, त्याचवेळी महाविकास आघाडी सरकारचा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आहे. याबरोबरच भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत देखील निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती आहे

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूका पुन्हा लांबणार..?

आदित्य ठाकरे यांच्यावर ‘म्याव’ टोमणे मारण्यास शिवसेनेचा आक्षेप, विधान परिषदेने मागितला घटनेचा अहवाल

ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं होतं. वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला होता.

धनंजय मुंडे इन ऍक्शन मोड! विधानपरिषदेने पुन्हा अनुभवले जुने धनंजय मुंडे!

Maharashtra govt plans to hold Speaker election tomorrow, seeks Governor nod

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी