30 C
Mumbai
Tuesday, May 16, 2023
घरराजकीयनारायण राणेंनी राहुल गांधींच्या हाताखाली काम केलेले माहीत नाही का; नितेश राणे...

नारायण राणेंनी राहुल गांधींच्या हाताखाली काम केलेले माहीत नाही का; नितेश राणे यांच्यावर काँग्रेसचा पलटवार

आमदार नितेश राणेंनी राहुल गांधी यांची तुलना दहशतवादी लादेन, माफिया दाऊदशी केली त्याच राहुल गांधी यांच्या हाताखाली नितेश यांचे पिताजी नारायण राणे यांनी दहा-बारा वर्षे काम केले, आहे याची त्यांना माहिती नाही का? नसेल तर नितेश यांनी वडिलांना विचारुन घ्यावे, असा पलटवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे. (Atul Londhe’s response to Nitesh Rane’s criticism of Rahul Gandhi)

राहुल गांधी हे सरकारी घरातच राहून देशाविरोधात बोलतात असेही नितेश राणे म्हणाले. राहुल हे दिल्लीत सरकारी घरातच राहताच, अंधेरीतील राणेंच्या राजमहालासारख्या अवैध बांधकाम केलेल्या घऱात ते रहात नाहीत ही वस्तुस्थिती आहे कारण ते गांधी आहेत राणे नाहीत. नेहरु-गांधी परिवाराने देशासाठी केलेला त्याग व बलिदान राणेसारख्या सुमार बुद्धीच्या लोकांना या जन्मीतरी समजणे शक्य नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तुलना दहशतवादी लादेन व कुख्यात गुंड दाऊदशी करुन आमदार नितेश राणे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. राहुल गांधी यांच्यावर बोलण्याएवढी नितेश राणे यांची राजकीय उंची व पात्रता नाही, त्यांनी वाह्यात बडबड थांबवावी अन्यथा त्यांचे वस्त्रहरण त्यांच्याच भाषेत करु, असा इशारा अतुल लोँढे यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा 

अदानी घोटाळ्याप्रकरणी सोमवारी राजभवनला घेराव !

आमदार रविंद्र वायकर यांनी महापालिकेचे मैदान बळकावले; किरीट सोमय्या यांचा आरोप

समाजाप्रती जैन समाजाची लोककल्याणकारी भावना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार 

अतुल लोंढे म्हणाले की, आमदार नितेश राणे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वाह्यात बडबड केली त्यावरूनच त्यांची राजकीय अपरिपक्वता दिसून येते. दररोज कोणाला तरी अर्वाच्च शिव्या देण्यापलिकडे राणेंना काही येत नाही. राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलतात, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मुक्ताफळे नितेश राणे यांनी उधळली आहेत. नितेश राणे यांच्या बोलण्याला महत्व देण्याची फारशी गरज नाही पण त्यांनी आमच्या नेत्यांबद्दल विचार करुन बोलावे अन्यथा आम्हालाही तुमच्याच भाषेत उत्तर देऊ तेंव्हा तुम्हाला तोंड लपवायला जागा मिळणार नाही, हे लक्षात ठेवा, असेही अतुल लोंढे यांनी ठणकावून सांगितले.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी