25 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
Homeमुंबईआमदार रविंद्र वायकर यांनी महापालिकेचे मैदान बळकावले; किरीट सोमय्या यांचा आरोप

आमदार रविंद्र वायकर यांनी महापालिकेचे मैदान बळकावले; किरीट सोमय्या यांचा आरोप

उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आमदार रविंद्र वायकर यांनी मुंबई महापालिकेचे 2 लाख चौरस फुटांचे मैदान बळकावल्याचा आरोप करत रविंद्र वायकर यांनी घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या ठिकाणी बेकायदेशीररित्या 500 कोटी रुपयांचे पंचतारांकित ह़ॉटेल बांधण्याची परवानगी दिली असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. याप्रकरणी आमदार वायकर आणि पालिका कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमय्या यांनी केली.  (Ravindra Waikar usurped the municipal ground; Allegation of Kirit Somaiya)

हे सुद्धा वाचा

समाजाप्रती जैन समाजाची लोककल्याणकारी भावना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार 

तालुक्यात 86 कोटी लाखाच्या निधीतून रस्त्यांचे मजबुतीकरण होणार; आमदार बाळासाहेब थोरातांच्या पाठपुराव्याला यश

सदानंद कदम यांना 5 दिवसांची ईडी कोठडी

ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांनी पालिकेच्या अखत्यारीतील मैदान बळकावले आहे. तसेच मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट आणि सुप्रीमो कंपनीच्या नावाखाली या मैदानाची रेडीरेकनर नुसार 4 कोटी किंमत होती मात्र वायकर यांनी ही जागा अवघ्या 3 लाख रुपयांमध्ये खरेदी केली. ही जागा लग्न पार्ट्यांसाठी वायकर भाड्याने देऊन अवैधरित्या पैसे कमवत आहेत. वायकर यांनी अवैधरित्या बळकावलेल्या मैदानावर पंचतारांकित हॉटेलचे बांधकाम सुरु केल्याचे सोमय्या म्हणाले. सोमय्या म्हणाले की, मुंबई महापालिका, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तसेच नगर विकास खात्याने या हॉटेलचे बांधकाम तातडीने थांबवावे अशी मागणी देखील सोमय्या यांनी केली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी