29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेनेते गेलेले माजी मंत्री राष्ट्रवादीत परतण्यासाठी आतूर

शिवसेनेते गेलेले माजी मंत्री राष्ट्रवादीत परतण्यासाठी आतूर

टीम लय भारी

सोलापूर : आपले राजकीय भवितव्य अंधारात दिसू लागल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप – शिवसेनेच्या तंबूत गेले होते. पण आता राजकीय परिस्थितीच विपरीत झाली आहे. त्यामुळे अनेकांना पक्षबदल केल्याचा पश्चाताप होऊ लागला आहे ( Dilip Sopal interested to return in NCP ).

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री दिलीप सपोल यांनाही अशीच पश्चातबुद्धी झाली होती. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देवून शिवसेनेत प्रवेश केला होता ( Dilip Sopal was joined Shivsena before assembly election) . बार्शी ( सोलापूर ) हा त्यांचा मतदारसंघ. मतदारदारांनी सोपल यांना त्यांची औकात दाखविली. सोपल यांचा विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला ( Dilip Sopal was lost election) .

Dilip Sopal with Anil Deshmukh
दिलीप सोपल यांनी अनिल देशमुख यांचीही भेट घेतली

शिवसेनेते डाळ शिजली नाही, आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी दिली आहे. त्यामुळे सध्या दिलीप सोपल यांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’ अशी झाली आहे. गड्या आपुला राष्ट्रवादी पक्षच बरा असे सोपल यांना वाटूल लागले आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत परतण्यासाठी आता हालचाली सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरेंच्या पुढे फायलींचा ढीग, फायलींना मंजुरी मिळत नसल्याने काँग्रेस – राष्ट्रवादीचे मंत्री हवालदील

सहकार मंत्र्यांनी बँकांवर उगारला आसूड, शेतकऱ्यांना नाडणाऱ्या बँकांविरोधात कारवाईचे निर्देश

शरद पवारांवर आरोप करण्यासाठी गोपीचंद पडळकर, महादेव जानकर हे फडविणासांनी वापरलेले नेते : उत्तमराव जानकर

‘आदित्य ठाकरेंना खून करावासा वाटला तर, पहिल्यांदा नारायण राणेंचा करतील’

अजित पवार यांच्याकडे बोळवण

‘कोरोना’च्या काळात गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे व पालकमंत्री दत्तात्रय भरणे वेगवेगळ्या वेळी सोलापूर दौऱ्यावर आले होते. या तिन्ही मंत्र्यांशी सोपल यांनी भेट घेतली. पाहुणचारासाठी घरीसुद्धा बोलावले.

Mahavikas Aghadi

घरी आलेल्या एका पाहुण्या मंत्र्यांना त्यांनी गळ घातली. मग या मंत्र्यांनी अजितदादा पवार यांच्याशी संपर्क साधला, अन् सोपल यांना परत राष्ट्रवादीमध्ये यायचे आहे असा निरोप दिला असल्याची माहिती या सूत्रांनी दिली ( Dilip Sopal was contacted to Ajit Pawar through senior minister ).

एवढेच नव्हे तर, अजित पवारांना हा निरोप आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही चाचपणी केली. पाटील यांनी राष्ट्रवादीच्या सोलापूरमधील पदाधिकाऱ्यांकडून भावना जाणून घेतल्या. सोपल यांना परत राष्ट्रवादीत घ्यायचे का याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांचे काय मत आहे यावर आता खल सुरू असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

शिवसेनेला विश्वासात घेणार कसे ?

काही दिवसांपूर्वी पारनेरमधील शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षात घेतले होते. त्यावरून शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी पसरली. त्यामुळे या नगरसेवकांना शिवसेनेत परतावे लागले होते. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षांमधील पदाधिकाऱ्यांना एकमेकांकडे प्रवेश करण्याची आता संधी राहिलेली नाही ( Shivsena is big hurdle to Dilip Sopal for rejoin NCP).

lay bhari

अशा परिस्थितीत सोपल यांना पुन्हा राष्ट्रवादीत कसे घेणार हा पेच राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर आहे. परंतु सोपल हे मुळचे राष्ट्रवादीचेच आहेत, हे शिवसेनेला पटवून देण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश आले तरच सोपल यांचा परतीचा मार्ग सुकर होऊ शकतो अशी प्रतिक्रिया या सूत्रांनी व्यक्त केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी