27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयराज्यात लवकरच वाळू स्वस्तात उपलब्ध होणार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

राज्यात लवकरच वाळू स्वस्तात उपलब्ध होणार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

टीम लय भारी

मुंबई:- राज्यातील जनतेस माफक दरात वाळू मिळावी या दृष्टीने वाळू, रेती उत्खननाबाबत सर्वंकष असे सुधारित धोरण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातील नदी व खाडी पात्रातील वाळू, रेती उत्खननाबाबतचे आता असलेले धोरण रद्द करण्यात आली, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.(Balasaheb Thorat Sand will soon be available cheaply in the state)

हरित लवादाने दिलेल्या निर्णयाला एकत्र करून आखावे लागते. महसूल विभागात वाळू हा विषय कायम वादाचा विषय असतो, सर्वोच्च, उच्च न्यायालय वाळू धोरण ठरवत असताना.  2019 ला जे वाळू धोरण केले त्यामुळे वाळूचे लिलाव होऊ शकले नाहीत.

हे सुद्धा वाचा

महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरण काँग्रेस खपवून घेणार नाही :नाना पटोले

नथुराम गोडसेच्या भूमिकेवर राजकीय नेते आणि सर्वसामान्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

संत साहित्य संमेलन उद्यापासून रायगडमध्ये

Maharashtra minister Balasaheb Thorat tests positive of Covid-19

वाळूचे लिलाव हे 2 वर्ष वाढू शकले नाही. यात अनेक प्रकार आहेत. त्यात कोरोनाचा प्रभाव ग्रामसभा, पर्यावरणाची मान्यता, पर्यावरण समिती या सगळ्या अडचणी असतात थोरात यांनी स्पष्ट केले.

खाडीपात्रातून हातपाटीने वाळू काढण्याच्या पारंपारिक व्यवसायासाठी राॅयल्टी दराने परवाने देण्याचा समावेश करून हे एकत्रित सुधारित धोरण तयार करण्यात आले आहे. बांधकाम थांबत नाही, त्यातून चोर्‍या होतात त्यामुळे विशेष निर्णय घेत लिलावाची रक्कम 6 ते 15 टक्के वाढते, त्यामुळे लिलावाची मूळ रक्कम 4 ते 5 हजारापर्यंत प्रति ब्रास गेला होता. आता लिलाव प्रति ब्रास 650 रुपयांपासून सुरू होईल, पूर्वी लिलाव 3 हजारापासून सुरू होत होता त्यामुळे आता वाळू स्वस्तात उपलब्ध होईल अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.

नागरिकांचे तीन ते पाच वर्ष हे लिलावासाठी जातात त्यामुळे आता लिलावासाठी काही नियम करणार आहेत आणि निश्चित केले आहे.  यात एका बाजूला नागरिकांना सहजतेने वाळू मिळाली पाहिजे हा उद्देश आहे तर दुसरीकडे शासकीय कामात वाळूची गरज असून त्यांना उपलब्धता करून देणे हादेखील प्रस्ताव यामध्ये आहे तिसरा मुद्दा जो काही वेळ आम्हाला मिळतो त्या वेळी आम्ही तिकडे लक्ष देऊ परंतु नागरिकांना स्वस्तात वाळू उपलब्ध करून मिळावी घराचे बांधकाम व्हावे हा उद्देश ठेवून हे सर्व निर्णय घेतले जाणार आहेत, असे देखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी