30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeटॉप न्यूजKirti shiledar : ज्येष्ठ गायिका अभिनेत्री किर्ती शिलेदार यांचे निधन

Kirti shiledar : ज्येष्ठ गायिका अभिनेत्री किर्ती शिलेदार यांचे निधन

टीम लय भारी

पुणे : ज्येष्ठ गायिका किर्ती शिलेदार यांचे निधन झालं आहे. त्या ७० वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राण ज्योत मालवली. वडील जयराम आणि आई जयमाला शिलेदार यांच्याकडून किर्ती शिलेदार यांना कलेचा वारसा मिळाला होता(Kirti Shiledar, Veteran singer-actress passes away).

तमाशातल्या मैनेपासून ते शास्त्रीय संगीतपर्यंतच्या गायणाच्या अनेक छटा किर्ती शिलेदार यांनी यशस्वीपणे सादर केल्या. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी संगीत रंगभूमी पाऊल ठेवले आणि अनेकांची मने जिंकली.

विविध संगीत नाटकांचे त्यांनी चार हजारांहून अधिक प्रयोग सादर करत ते गाजवले. भारतासह परदेशात संगीत नाटकांचे प्रयोग, नाट्यपदांच्या मैफली, सप्रयोग व्याख्याने त्यांनी दिली आहेत. पारंपरिक संगीत नाटकांप्रमाणेच स्वरसम्राज्ञी, अभोगी, मंदोदरी आदी वेगळ्या धाटणीची नाटकेही त्यांनी गाजवली.

यातील एकच प्याला, कान्होपात्रा, द्रौपदी, मानापमान, ययाति आणि देवयानी, शाकुंतल, संशयकल्लोळ, सौभद्र अशा संगीत नाटकांत त्यांनी काम केले. त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचं निधन

ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत काळाच्या पडद्याआड

N.D. Patil Confronted the Powerful and Comforted the Poor Till His Last Breath

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी