25 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeराजकीयबिहारमध्ये जेडीयू-भाजपात मंत्रीपदावरून रस्सीखेच,आमदारांची आज पुन्हा बैठक

बिहारमध्ये जेडीयू-भाजपात मंत्रीपदावरून रस्सीखेच,आमदारांची आज पुन्हा बैठक

टीम लय भारी

पाटणा l बिहारमध्ये एनडीएला काठावर बहुमत मिळाले. जेडीयूपेक्षा जास्त जागा भाजपाल्या मिळाल्या. मात्र मंत्रीपदाच्या वाटपावरून दोन्ही पक्षामध्ये अंतर्गत वाद सुरु  आहे. त्यामुळे एनडीएने आज रविवार १५ नोव्हेंबर रोजी नवनिर्वाचित आमदारांची पाटणा येथे बैठक बोलावली आहे.

प्रचारादरम्यान सांगितल्याप्रमाणे भाजपा नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यास तयार आहे. मात्र, संख्याबळानुसार कॅबिनेटमध्ये जास्तीत जागा भाजपाला हव्या आहेत. याशिवाय, महत्वपूर्ण खात्यांवर देखील भाजपाने दावा केला आहे. जे अगोदर जदयूकडे असायचे. या सर्व वादावर चर्चा करण्यासाठी सुशील मोदी दिल्लीला बोलावून घेण्यात आले आहे.

सुशील मोदी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे सुशील मोदी यांनी जास्त मंत्रीपद आणि महत्वाच्या खाते घेण्यासाठी यादी सोपवली आहे अशीही माहिती समोर येत आहे. एनडीए आमदारांची संयुक्त बैठक देखील रविवाही १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यामध्ये नितीश कुमार यांची एनडीएचा नेता म्हणून निवड केली जाईल अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

बिहार निवडणुकीत भाजपा ७४ जागा जिंकून एनडीएत सर्वात मोठा पक्ष बनला आहे. आतापर्यंत सत्तेची सुत्रधार राहिलेल्या जदयूकडे यंदा ४३ जागा आल्या आहेत. तर, असा देखील अंदाज लावला जात आहे. उपमुख्यमंत्रीपदासाठी भाजपाकडून अतिमागासवर्गातून एखादे नाव पुढे केले जाऊ शकते. तसेच, याबाबत अद्याप काही निश्चित झालेले नाही.

सुशील मोदींच्या जागेवर कोणाला आणले जाईल. उत्तर प्रदेशप्रमाणे दोन उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्मुला देखील अवलंबला जाऊ शकतो. भाजपाकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी आरएसएसशी निगडीत नेते कामेश्वर चौपाल यांच्या नावाची चर्चा आहे. चौपाल हे दलित समाजाचे प्रतिनिधित्व करतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी