28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयभाजप - शिवसेना महायुतीत फाटाफूट

भाजप – शिवसेना महायुतीत फाटाफूट

लय भारी न्यूज नेटवर्क

नाशिक : मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असताना शिवसेना भाजपात फाटाफूट झाली आहे. नाशिकमधील भाजप – शिवसेनेतील युती तुटली असून शिवसेनेच्या ३५० पदाधिकाऱ्यांसह ३६ नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. यामुळे नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.

नाशिक पश्चिमची जागा भाजपला सोडल्याने भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. या मतदारसंघात भाजपने घुसखोरी केल्याचे सांगत शिंदेंच्या समर्थनार्थ शिवसेनचे महानगर प्रमुख, पालिकेतील विरोधी पक्षनेते आणि ३५ नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भाजप आमदार सीमा हिरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यापुढे शिवसैनिक म्हणूनच काम करणार असल्याचे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
नाशिक पश्चिममधील शिवसेनेची बंडखोरी रोखून नेत्यांची मनधरणी करण्यात भाजप नेते आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपयश आले आहे. सिंधुदुर्गानंतर आता नाशिकमध्येही शिवसेना-भाजप युतीला झटका बसला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी