29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeराजकीयतुम्हीच आमचे नेते, तुम्हीच आमची कमिटी...साहेब, राजीनामा मागे घ्या, छगन भुजबळ यांची...

तुम्हीच आमचे नेते, तुम्हीच आमची कमिटी…साहेब, राजीनामा मागे घ्या, छगन भुजबळ यांची भावनिक साद !

शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावना अनावर होऊन त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळू लागताच ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तुम्हीच आमची कमिटी तुम्हीच आमचे सर्वस्व आहात, असे सांगून आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो मागे घ्या, असे कळकळीचे आवाहन शरद पवार यांना सगळ्यांच्या वतीने केले. 

शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावना अनावर होऊन त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळू लागताच ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तुम्हीच आमची कमिटी तुम्हीच आमचे सर्वस्व आहात, असे सांगून आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो मागे घ्या, असे कळकळीचे आवाहन शरद पवार यांना सगळ्यांच्या वतीने केले.

भुजबळ म्हणाले, “साहेब तुम्ही तुमचं वय झालं आहे, वगैरे जे सांगत आहात ते काही आम्हाला मंजूर नाही. या वयातही तुमचा उत्साह हा आम्हाला लाजवणारा आहे. आमच्या कुणाहीपेक्षा तुम्ही आमच्यापेक्षा दसपट…आमच्यापेक्षा दसपट काम करता. आज या पक्षाला, राज्याला आणि देशाला तुमच्या नेतृत्वाची गरज आहे. अशावेळी तुम्ही असा निर्णय घेणं हे आम्हालाच काय देशातल्या कुठल्याही व्यक्तीला मान्य होणार नाही. त्यामुळे आपण राजीनामा मागे घ्यावा, अशी सगळ्यांच्या वतीने आपणास विनंती आहे.

आम्ही सगळेच तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागलो आहोत. तुमच्यासोबत सुखात आणि दुःखात चाललो आहोत. तुम्ही आमच्या सोबत राहिला आहात, अशावेळी तुम्हाला बाजूला ठेवून काम कसे करणार? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला.  कमिटी वगैरे आम्हाला काहीही मंजूर नाही. आम्हाला ते काहीही नको. तुम्हीच आमचे नेते, तुम्हीच आमची कमिटी आणि तुम्हीच सर्वस्व आहात, असे म्हणत राजीनामा मागे घेण्याचा निर्णय तुम्ही घ्यावा असे आवाहन भुजबळ यांनी केले.

हे सुद्धा वाचा :

शरद पवार म्हणाले, माझे घर काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे !

TDM चित्रपटाला शोज मिळेना! अभिनेता भावूक; अजित पवारांची प्रतिकिया

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले ; नाराज कार्यकर्त्यांचा गोंधळ

“लोक माझे सांगाती” या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी राष्टवादी कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाला पक्षातील कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवून सभागृहात गोंधळ घातला. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती करून कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. यावेळी संपूर्ण वातावरण भावूक होऊन राष्ट्रवादीतील नेते आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते.

chagan bhujbal request sharad pawar to take his resign decision back तुम्हीच आमचे नेते, तुम्हीच आमची कमिटी…साहेब, राजीनामा मागे घ्या, छगन भुजबळ यांची भावनिक साद ! chagan bhujbal, sharad pawar, ncp, supriya sule, ajit pawar,

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी