30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले ; नाराज कार्यकर्त्यांचा गोंधळ

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले ; नाराज कार्यकर्त्यांचा गोंधळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. अचानक केलेल्या या घोषणेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह शरद पवार यांचे समर्थक आणि चाहते बुचकळ्यात पडले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. अचानक केलेल्या या घोषणेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह शरद पवार यांचे समर्थक आणि चाहते बुचकळ्यात पडले आहे.

‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहात पार पडले. या प्रकाशन सोहळ्यात बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली.

शरद पवार म्हणाले, गेली २४ वर्षे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करीत आहे. आता कुठेतरी थांबायचा विचार केला पाहिजे. माणसाला अधिक मोह असणे योग्य नाही. तुम्हाला कदाचित अस्वस्थता वाटेल, पण आज सकाळीच मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी नव्या अध्यक्षांसंबंधी निर्णय घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. “मी कुठेही असलो तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्यासाठी उपलब्ध राहीन, हे आश्वस्त करतो. जनतेचे प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे. गेली ६० वर्षांहून अधिक काळ मी राजकारण आणि समाजकारणात मी सक्रिय आहे. यापुढेही मी सार्वजनिक जीवनात कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुध्दा वाचा :

अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पैशांची देवाणघेवाण, PWD मंत्र्यांनी व्यक्त केली हतबलता !

मिशी कधी काढणार? आमदार संतोष बांगर यांना जयंत पाटलांची विचारणा

बारसू रिफायनरीविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढणार ; सत्यजीत चव्हाण यांचा निर्धार..!

शरद पवार यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा करताच सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शरद पवारांनी निवृत्तीचा आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर धाव घेत पवारांना गराडा घातला. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. काही कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी