32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयपवार साहेबांचे विचार घेऊन एकलव्यासारखं निष्ठेने काम करत राहू : प्रशांत विरकर

पवार साहेबांचे विचार घेऊन एकलव्यासारखं निष्ठेने काम करत राहू : प्रशांत विरकर

देशाच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड घडली, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्राच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर करताच पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली, अनेक कार्यकर्ते, नेते धायमोकलून रडू लागले… पवारांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून उपोषण करणार असल्याचे देखील अनेकांनी बोलून दाखवले. त्यानंतर राज्यासह देशभरात त्या घटनेचे पडसाद उमटत आहेत.

माण-खटाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत विरकर म्हणाले,  साहेब हे आमचे प्रेरणास्थान, शक्तिपीठ असल्याचे म्हणत. त्यांनी निर्णयाचा पूनर्विचार करावा, परंतू त्यांनी निर्णय मागे घेतला नाही तरी आम्ही कार्यकर्ते एकलव्याप्रमाणे साहेबांचे विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम करत राहू, असे म्हटले आहे.

प्रशांत विरकर यांनी पत्रकाव्दारे म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमचे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रीय पक्षाध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. खरंतर हे मनाला न पटणार व कदापी मान्य न होणारा असाच एक निर्णय म्हणावा लागेल. आम्हा कार्यकर्त्यांना साहेब हे नेहमीच एक प्रेरणास्थान, आमचं स्फूर्ती स्थान आम्हाला ऊर्जा देणारे एक शक्तिपीठ आहेत. साहेब हे जगातील प्रत्येक राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचं एक विद्यापीठ आहेत. साहेबांचे अनेक पैलू नेहमीच नवीन शिकवण देत असतात. साहेबांनी आजपर्यंत आम्हाला राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा विविध घटकांच्या संबंधित केलेले मार्गदर्शन, दिलेले विचार हे आमच्यासाठी आयुष्याची शिदोरी आहे.

हे सुद्धा वाचा
तुम्हीच आमचे नेते, तुम्हीच आमची कमिटी…साहेब, राजीनामा मागे घ्या, छगन भुजबळ यांची भावनिक साद !

TDM चित्रपटाला शोज मिळेना! अभिनेता भावूक; अजित पवारांची प्रतिकिया

शरद पवार म्हणाले, माझे घर काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे !

साहेबांनी या त्यांच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा साहेबांकडे अखंड ऊर्जा स्त्रोत आहे साहेब आणखी काही काळ नेतृत्व करू शकतात यावर आमचा ठाम विश्वास आहे. परंतु साहेबांनी जरी आपला निर्णय मागे घेतला नाही तरी आम्ही त्यांचे कार्यकर्ते एकलव्याप्रमाणे साहेबांचे विचार घेऊन महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात तेवढ्याच ताकतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम करत राहू. साहेबांनी दिलेल्या विचारांना घेऊन दिल्लीच्या तक्तापर्यंत आगे कूच करण्याचा आम्ही प्रयत्न करू. साहेब हा कधी न संपणारा विचार आहे त्यामुळे साहेब कुठेजरी असले तरी आम्हा कार्यकर्त्यांसाठी साहेब कायमच पाठबळ देत राहतील, असे प्रशांत विरकर यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी