38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयशरद पवार म्हणाले, माझे घर काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे...

शरद पवार म्हणाले, माझे घर काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे !

माझे वडील बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते असल्यामुळे माझे घर हे काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते. मात्र, महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमुळे आम्ही काँग्रेसच्या जवळ जाऊ लागलो. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांकडे मी आकर्षित झाल्यामुळे माझ्या घरातील वातावरण आणि माझे विचार वेगळे झाल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.  

माझे वडील बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते असल्यामुळे माझे घर हे काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते. मात्र, महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमुळे आम्ही काँग्रेसच्या जवळ जाऊ लागलो. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांकडे मी आकर्षित झाल्यामुळे माझ्या घरातील वातावरण आणि माझे विचार वेगळे झाल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.

“लोक माझे सांगाती”  या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात पवार यांनी आपला संपूर्ण जीवनपट उलगडून दाखविला. ते म्हणाले, मला विद्यार्थी चळवळीत आधिक रस होता. नववीत असताना मी पहिला मोर्चा काढला. १९६७ पर्यंत मला आमदार म्हणून संधी मिळाली. त्यानंतर सतत मी विविध पदांवर आहे. म्हणजेच, गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे.

सुरुवातीला काँग्रेस पक्षाचा सदस्य झालो. हळहळू पुण्यात काम केले. त्यानंतर मला मुंबईत काम करण्यास सांगितल्याने महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांशी संपर्क आला. त्यावेळी अनेक मोठे नेते हॉटेलमध्ये नव्हे तर पक्षाच्या कार्यालयात किंवा कार्यकर्त्यांच्या घरी उतरत होते. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्यांशी संपर्क आला. त्यावेळी युनोस्कोच्या संघटनेसाठी माझी निवड झाली. मला जपान, अमेरिकामध्ये जाण्याची संधी मिळाली. जपानला आम्ही गेलो तेव्हा जपानच्या पंतप्रधानच्या कार्यालयात काम करायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यलयात काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी दौरा सोडून मला परत बोलवले. जपानमध्ये पंतप्रधानांचे कार्यक्रमाचे नियोजन आम्ही केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली.त्यावेळी दौरा सोडून मला परत बोलवले. मला विधानसभेला उभे राहण्याची संधी मिळाली. १९६७ मध्ये तिकीट मिळाले. निवडणूक सोपी नव्हती. मात्र, अनेक वर्षे युवकांच्या चळवळीत आणि त्यानंतर विद्यार्थी चळवळीत काम केले. त्याचा फायदा होऊन निवडणुकीत निवडून आल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा :

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले ; नाराज कार्यकर्त्यांचा गोंधळ

शरद पवारांनंतर कोण? अजित पवार की सुप्रिया सुळे ?

बाळासाहेबांनीही दिला होता शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा ….

जनतेने मला ५६ वर्षे  निवडून दिले आहे. इतकी वर्ष मी कुठल्या न कुठल्या सभागृहाचा सदस्य राहिलो. इतकी वर्षे राजकारणात काम केलेली व्यक्ती देशात हयात नाही. त्यामुळे आता निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा पवार यांनी केली. राष्ट्रवादीकडून नवीन पिढीला संधी दिली जाईल. खासदारकीची ३ वर्ष राज्य आणि त्यानंतर देशाच्या राजकारणात लक्ष घालणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

sharad pawar, ncp, congress, shetkari kamgar paksh, ajit pawar, sharad pawar says our origin party is shetkari kamgar paksh not congress

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी