32 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeराजकीयचंद्रकांत पाटील यांनी नवीन इमारती आणि वसतीगृहांच्या बांधकामांसाठी केली भरगच्च निधीची घोषणा

चंद्रकांत पाटील यांनी नवीन इमारती आणि वसतीगृहांच्या बांधकामांसाठी केली भरगच्च निधीची घोषणा

उच्च व तंत्र शिक्षण यांच्या अधिपत्याखालील नवीन इमारत बांधकाम आणि इमारतींच्या दुरूस्तींची कामे, विद्यापीठ इमारती, विविध कार्यालये, वसतीगृह दिलेल्या कालमर्यादेपर्यंत पूर्ण करावीत. तसेच त्यासाठी नियोजन करून निधीची उपलब्धता सुनिश्चित करावी. अशी माहिती आता उच्च व तंत्र शिक्षणमंत्री भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी निर्देश दिले आहेत. मंत्रालयामध्ये चंद्रकांत पाटील यांची आज बैठक झाली त्या बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठ इमारती, नवीन इमारत बांधकाम व इमारतींच्या दुरूस्तींची कामे करण्यात यावी हा मुद्दा बैठकीमध्ये मांडण्यात आला.

एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता रणजित हांडे, जे. जे महाविद्यालयाचे संचालक राजेश मिश्रा, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव अशोक मांडे, प्रताप लुबाळ, सहसंचालक हरीभाऊ शिंदे, आदीनाथ मंगेशकर, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी हे बैठकीमध्ये उपस्थित होते.

हे ही वाचा

‘या’ अभिनेत्रीची होणार झी मराठीच्या मालिकेत धमाकेदार एन्ट्री, प्रोमो झाले व्हायरल

सिराजने द. आफ्रिकन खेळाडूंना केलं चारही मुंड्या चित

श्रीदेवी प्रसन्न चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकरची केमिस्ट्री

‘लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आणि भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संग्रहालयाच्या बांधकामाबाबत निधी देण्यात येणार आहे. यासाठी इमारतीच्या बांधकामातील संरचनेमध्ये काही बदल असल्यास त्याबाबत सांगावे. त्यानंतर इमारतीच्या संचनेमध्ये अंदाजपत्रकानूसार कोणताही बदल होणार नाही. वसतिगृह इमारत बांधकाम सुरू करावे. पुढील दोन वर्षात मुलींना वसतिगृह उपलब्ध झाले पाहिजे. त्यानुसार नियोजन करावे’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, येथे प्रस्तावित बांधकामांबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, इमारतींच्या बांधकामांसाठी २५० कोटींचा निधी असावा, त्यानंतर निधी लागल्यास त्या निधीत वाढ करण्यात येईल. हेरीटेज इमारत असल्यामुळे काम दर्जेदार करावे. एसएनडीटी विद्यापीठाच्या जुहू येथील सभागृहाचे काम बदल न करता पूर्ण करावे. वांद्रे येथील सर जे. जे. कला महाविद्यालय संस्थेचे वसतीगृह व वास्तुशास्त्र वसतीगृह इमारतीचे काम सुरू करावे. शास्र निकेतन इमारतीला रंगरंगोटी करून त्याला सुंदर करण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी