27 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
Homeराजकीयजालना जिल्ह्यात 'ओबीसी एल्गार महासभा' 'या' नेत्याने पोस्टर शेअर करत दिली माहीती

जालना जिल्ह्यात ‘ओबीसी एल्गार महासभा’ ‘या’ नेत्याने पोस्टर शेअर करत दिली माहीती

राज्यात अनेक दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसी (OBC) प्रवर्गात सामावून घेण्यासाठी सरकरकडे मागणी केली आहे. मात्र सरकार यावर कोणतेही पाऊल उचलत नसल्याचे मराठा समाजाचे म्हणणे आहे. या आरक्षणावरून मराठा (Maratha Reservation) समाजातील अनेक तरूणांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे वारंवार सांगत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे पण ते इतर कोणत्याही समाजातील आरक्षणाला धक्का न लागता दिले जाणार असल्याचा दावा सरकारने केला आहे. ओबीसी समाजाने याविरोधात प्रतिसभा आयोजित केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी पहिली सभा ही अंबड तालुक्यात घेतली. तर आता ओबीसी समाजही अंबड तालुक्यात सभा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Chhagan Bhujbal)

ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मनोज जरांगे-पाटील यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेकदा वाद झाले. यावर छगन भुजबळ यांनी ७०० कोटी रूपये आले कुठून असा सवाल देखील केला होता. एकरच्या एकर सपाट करत सभा घेत असल्याचे वक्तव्य भुजबळांनी केले होते. दरम्यान, काही दिवसांआधी मराठा आरक्षण हक्क ठराव परिषदेची बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजाने छगन भुजबळ यांना मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाविरोधात छगन भुजबळ काम करत असल्याचा मराठा समाजाचा दावा आहे. मराठा समाज हा ओबीसी समाजात घुसखोरी करत असल्याचे ओबीसी बांधवांनी आरोह केला आहे. या विरोधात ओबीसी समाजाने अंबड तालुक्यात ओबीसी एल्गार महासभेची घोषणा केली आहे, ही सभा (१७ नोव्हेंबर) दिवशी सकाळी ११ वाजता असणार आहे. याबाबत ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

हे ही वाचा

‘मनोज जरांगेंच्या मागून कोणी तरी बोलतंय’?

‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणत मतदान करा’

दिवाळीसाठी दिलेल्या शिध्यात किडे, जाळ्या…

काय आहे ट्वीट

एक दिवस भविष्यासाठी, ओबीसींच्या पुढील पिढ्यांचे भविष्य वाचविण्यासाठी एकजुटीने उभे राहूया, जगाला आपली ताकद दाखवून देऊया! ओबीसी एल्गार महासभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा! असे आवाहन छगन भुजबळांनी केले आहे. त्यांनी एक पोस्टर शेअर करत ओबीसी समाजातील नेत्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत आणि समाजाला होणारा त्रास पोस्टरवर नमूद करण्यात आला आहे.

काय लिहीलं पोस्टरमध्ये

महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बंधू-भगिनींनो, राज्यात आपल्या ओबीसी प्रवर्गातील विविध घटकांना मिळून लोकसंख्येच्या तुलनेत आधीच कमी असलेल्या आरक्षणामध्ये काही घटक मागच्या दाराने घुसखोरी करु पाहात आहेत. आंदोलनाच्या नावाखाली ओबीसी नेते, पदाधिकारी यांच्यावर हल्ले करून ओबीसी समाजात दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. हे सर्व प्रकार म्हणजे ओबीसींचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असून अप्रत्यक्षपणे ओबीसी आरक्षण संपविण्याचाच घाट घातला जात आहे.

याविरोधात वेळीच उभे राहणे गरजेचे असून आपण त्या दृष्टीने विविध माध्यमातून आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अंबड जि. जालना येथे ओबीसींची ‘एल्गार महासभा होत आहे. आपल्या पुढील पिढ्यांच्या भविष्याच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याची आणि आपली ताकद दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे या एल्गार महासभेला आपण मोठ्या संख्येने उपस्थित रहा! असा संदेश ओबीसी बांधवांना पोस्टरच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी