28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीय'जय भवानी, जय शिवाजी' म्हणत मतदान करा'

‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणत मतदान करा’

राज्यात निवडणुकांची तारीख अजूनही ठरली नसताना विरोधक आणि सत्ताधारी आपापल्या पक्षाचा अप्रत्यक्षरित्या प्रचार करत असल्याच्या चर्चा आहेत. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याचा भाजपचा (BJP) मनसुभा आहे. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधानांनी कर्नाटकमध्ये जाऊन ‘बजरंग बली की जय’ (Jay Bajrang Bali) अशी घोषणा केली होती. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीवेळी प्रचारासाठी आले असता त्यांनी हनुमानाचा गजर केला. तर काही दिवसांपूर्वी भाजप नेते अमित शाहांनी यंदा मध्यप्रदेशमध्ये भाजप सरकारला निवडूण आणा, भाजप सरकार श्रीरामाचे दर्शन घडवून देईल. असे वक्तव्य अमित शाहांनी (Amit Shaha) केले होते, यावर आता उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोदी (Narendra Modi) आणि भाजपावर सडकून टीका केली.

शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत भाजपाला खडेबोल सुनावले आहे. मे महिन्यात पंतप्रधानांनी बजरंग बली की जयच्या घोषणा केल्या होत्या. यावर आता उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे, अमित शाहा आणि मोदींच्या सततच्या वक्तव्यावर निवडणूक आयोगाने आचारसंहिता बदलली का? असा सवाल केला आहे. दिवाळी दणक्यात साजरी झाली. टीम इंडिया चांगली खेळली. विराटचे अभिनंदन. आमच्या पिढीने सुनिल गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे तीन दिग्गज पहिले आहेत. तर दुसरीकडे निवडणुक सुरू आहे. एका बाजूला वर्ल्डकप सुरू आहे. निवडणूक आयोगाला (Election Commision) आम्ही नोटीस लिहीली आहे. भाजपला फ्री हिट द्यायची आणि आमची विकेट घ्यायची हे बरोबर नाही. १९९५ साली आमचं सरकार राज्यात आले तेव्हा आम्ही हिंदुत्वाचा प्रचार केल्याने मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला.

हे ही वाचा

दिवाळीसाठी दिलेल्या शिध्यात किडे, जाळ्या…

मोहम्मद शमी विजयाचा शिल्पकार; न्यूझीलंडविरोधात ‘सत्ते पे सत्ता’ खेळी

नाना पाटेकरांनी चाहत्याच्या कानाखाली काढला जाळ?

‘भाजप बजरंग बली की जय म्हणत मतदान करा म्हणाले. मध्यप्रदेशमध्ये निवडणुकीला आयोध्येत खर्च येणार नसल्याचे म्हणत आहेत. भाजपकडून मोफत आयोध्या वारी घोषणा होईल २२ जानेवारीला राममंदिर सुरू होईल’. यावर आता उद्धव ठाकरेंनी ‘जय भवानी जय शिवाजी, हरहर महादेव म्हणून तुम्ही आता मतदान करा. हे मी जनतेला आवाहन करतो. निवडणुक आयोगाने आचारसंहितेत हदल केला आहे का? प्रश्न आम्हाला पत्रातून विचारण्यात आला आहे. प्रियंका गांधी, राहुल गांधी, केजरीवालांनी निवडणुक आयोगाला नोटीस पाठवल्या आहेत. यामुळे आता तरी निवडणूक आयोगाने सरकरी भाषेत आपला निर्णय अवगत करावा’, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यांनी ट्वीट करतही भाजपवर निशाणा साधला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी