26 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
Homeराजकीयदिवाळीसाठी दिलेल्या शिध्यात किडे, जाळ्या...

दिवाळीसाठी दिलेल्या शिध्यात किडे, जाळ्या…

दिवाळीत फराळ बनवण्यासाठी सरकारकडून ‘आनंद शिधा’ संकल्पनेच्या माध्यमातून शिधा वाटप करण्यात आला होता. यासाठी अनेक सामान्य नागरिकांनी या शिधाचा लाभही घेतला. मात्र या शिधापासून माणसांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. सरकारने केवळ शिधा वाटप करण्याच्या जाहिराती केल्या आहेत, मात्र याचा दर्जा कसा आहे, हे न पाहताच सामान्य जणांना शिधा वाटण्यात आला. याची पडताळणी करत राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार सुप्रिया सुळेंनी (supriya Sule) ट्वीट करत खुलासा केला आहे. निकृष्ठ शिधेच्या प्रकरणावर त्यांनी सत्ताधारी मंडळींवर टीका केली असून गोरगरीबांच्या दिवाळीसोबत सरकारने (maharashtra Government) थट्टा केली असल्याची भावना व्यक्त केली.

दिवाळी सणानिमित्ताने सरकारने सामान्य नागरिक, गोरगरीबांना शिधावाटप केला आहे. आनंदाचा शिधा या संकल्पनेतून सरकारने ही भूमिका घेतली आहे. केवळ १०० रूपयांच्या दरात हा शिधा वाटप केला जात होता. मात्र या शिधामध्ये आळ्या, किडे आढळून येत आहेत. गेल्या वर्षभरात गणेशोत्सव, पडव्याला शिधा वाटला गेला आहे. निकृष्ट दर्जाचे पामतेल वाटण्यात आले आहे. गोरगरीबांची शासनाने क्रूर अशी थट्टा केली आहे. गोरगरीबांची थट्टा करणाऱ्या शासनाचा निषेध करत सुप्रिया सुळेंनी सरकरला खरी खोटी सुनवली आहे.

हे ही वाचा

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

निकृष्ट दर्जाचा शिधा गोरगरीबांना दिला गेल्याने सुप्रिया सुळेंनी सरकारवला धारेवर धरले असून त्या म्हणाल्या, ‘गोरगरीब जनतेला दिवाळी सणासाठी दिला गेलेला ‘आनंदाचा शिधा’ हा खाण्यास अयोग्य असल्याचे निदर्शनास आले आहे. डाळींमध्ये किडे, रव्यामध्ये जाळ्या, निकृष्ट दर्जाचे पामतेल अशा पद्धतीचे साहित्य वाटण्यात आले.‌ हि गोरगरीब जनतेची शासनाने केलेली क्रूर अशी थट्टा आहे’. गोरगरीबांच्या दिवाळीची अशी थट्टा करणाऱ्या शासनाचा तीव्र निषेध करत सुप्रिया सुळेंनी सरकारचे कान टोचले आहेत.

आनंदाचा शिधा वाटपावरून अंधारेंची उडी

या शिध्यावरून राज्यात चांगलीच चर्चा झाली. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) आनंदाचा शिधाबाबत वक्तव्य केले आहे. अंधारे म्हणाल्या की, आनंदाचा शिधा माध्यामातून १०० रूपयात दिवाळी फराळासाठी लागणारा शिधा हा अन्नपदार्थांच्या छापील वजनापेक्षा त्यातील अन्नपदार्थाचे वजन कमी असल्याचा दावा अंधारेंनी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी