29 C
Mumbai
Sunday, July 7, 2024
Homeराजकीयशिवसेना, राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद, तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद

शिवसेना, राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद, तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये सत्ता स्थापनेबाबत पुरते एकमत झाले आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला अडिच वर्षांकरीता मुख्यमंत्रीपद, तर काँग्रेसला पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद असा फॉर्म्यूला निश्चित झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

खासदार अहमद पटेल, खासदार मल्लिकार्जून खर्गे व के. सी. वेणूगोपाल या काँग्रेसच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांनी काल शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अहमद पटेल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हॉटेल ट्रायडंट येथे भेट घेतली. या विविध बैठकांमध्ये सत्तेचा फॉर्म्यूला निश्चित झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘लय भारी’ न्यूज पोर्टलवरील अशा बातम्या वॉट्स अपवर मिळविण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाबरोबर इतर मंत्रीपदे व महामंडळांबाबतचाही फॉर्म्यूला ठरला आहे. इतर मंत्रीपदे व महामंडळे तिन्ही पक्षांमध्ये समान पद्धतीने वाटप केली जातील, असे ठरले आहे. राज्यभरात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही येथून पुढे कशा पद्धतीने सत्ता वाटप राहिल याबाबतही या बैठकांमध्ये ठरविण्यात आल्याचे समजते.

शिवसेनेच्या न्यायालयीन याचिकेवरील सुनावणी लांबणीवर

राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी पुरेसा वेळ दिला नाही, असा दावा करीत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काँग्रेसचे नेते एड. कपिल सिब्बल हे शिवसेनेचे वकिल आहेत. ही याचिका आज सुनावणींच्या यादीत नमूद झालेली नाही. त्यामुळे आज तरी याचिकेवर तातडीने सुनावणी होणार नाही. उद्या किंवा त्यानंतर ही याचिका सुनावणीसाठी येऊ शकते असे सूत्रांनी सांगितले.

लांबलेली सुनावणी शिवसेनेसाठी फायद्याचीच

शिवसेनेने दाखल केलेली याचिका सुनावणीसाठी तातडीने न्यायालयासमोर आली नाही, तरी त्याचा फार फरक पडणार नाही. कारण काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत सत्तेच्या वाटाघाटी करण्यासाठी शिवसेनेला आणखी वेळ मिळणार आहे. या तिन्ही पक्षांमध्ये एकमत होण्यास काहीसा वेळ लागेल. परंतु ठोस एकमत करून हे तिन्ही पक्ष सत्तेचा चांगला फॉर्म्यूला तयार करू शकतात. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी तिन्ही पक्ष एकत्रितपणे सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांना भेटतील तेव्हा त्यांना सत्तेचे निमंत्रण द्यावेच लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

काल मंत्रीपदे गेली; आज कार्यालये, गाड्या, बंगल्यांवरही गंडांतर

उद्धव ठाकरे – अहमद पटेल यांच्यात चर्चा, राष्ट्रवादीचीही आज बैठक

शिवसेनेला काँग्रेस – राष्ट्रवादी उल्लू बनवित आहे : नारायण राणे

राष्ट्रपती राजवटीमुळे जनतेवर कोणता फरक पडेल ? जाणून घ्या वैशिष्ट्ये

राज्यपालांची भूमिका त्यांच्या टोपीच्या रंगाला साजेशी; काँग्रेसचा हल्लाबोल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी