31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeराजकीयCovid2019 : विजेचे दिवे चालू ठेवूनच मेणबत्ती पेटवा : ऊर्जा मंत्र्यांचे आवाहन

Covid2019 : विजेचे दिवे चालू ठेवूनच मेणबत्ती पेटवा : ऊर्जा मंत्र्यांचे आवाहन

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर ( Covid2019 ) येत्या रविवारी रात्री ९ मिनिटे घरातील विजेचे दिवे बंद ठेवून मेणबत्ती पेटविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मोदी यांच्या या आवाहनावर देशभरातून जोरदार टीका होऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही जनतेला महत्वाचे आवाहन केले आहे. विजेचे दिवे बंद करू नका. हे दिवे चालू ठेवूनच मेणबत्ती पेटवा, असे आवाहन डॉ. राऊत यांनी केले आहे.

विजेची मागणी अचानक कमी झाली तर मोठा तांत्रिक बिघाड होईल. त्यामुळे महाराष्ट्र व देश अंधारात जाईल. ही परिस्थिती सुरळीत होण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी लागू शकतो. ‘कोरोना’ ( Covid2019 ) लढाईच्या काळात विजेचा घोटाळा झाला तर रूग्णालये व अत्यावश्यक सेवा कोलमडू शकते. त्यामुळे पंतप्रधानांच्या विधानाचा सगळ्यांनी काळजीपूर्वक विचार करावा, असे डॉ. नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

डॉ. राऊत पुढे म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात विजेची मागणी २३ हजार मेगावॅटवरून १३ हजार मेगावॅटवर आली आहे. लॉकडाऊनमुळे ( Covid2019 )  उद्योग क्षेत्रातील वीज मागणी शून्यावर आली आहे. १३ हजार मेगावॅटचा वापर फक्त अत्यावश्यक सेवा आणि घरगुती वीज यांच्यामुळे सुरू आहे. अशा स्थितीत जर सगळ्यांनी अचानक दिवे बंद केले, तर ग्रीड फेल होऊन सर्व पॉवर स्टेशन्स उच्च फ्रिक्वेन्सीवर ट्रिप होतील. त्यामुळे संपूर्ण राज्य अंधारात जाईल.

महाराष्ट्रात विजेची मागणी मोठी आहे. ग्रीड बंद पडले तर मल्टी स्टेट ग्रीड फेल्यूअर होईल. त्यामुळे पूर्ण देश अंधारात जाऊ शकतो. अत्यावश्यक सेवा, हॉस्पीटल सेवा विस्कळीत होतील. एक पॉवर स्टेशन पुन्हा चालू व्हायला साधारण १६ तास लागतात. त्यामुळे सगळी परिस्थिती सुरळीत व्हायला साधारण एक आठवडा जाईल. म्हणून जनतेला सल्ला द्यायचा आहे की, आपण पुनर्विचार करावा. ‘कोरोना’ ( Covid2019 ) युद्धासाठी देशातील वीज महत्वाचा व अत्यावश्यक घटक आहे. त्यामुळे विजेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण सहकार्य करावे, असे डॉ. राऊत यांनी आवाहन केले आहे.

यशवंत सिन्हा यांनी उडविली खिल्ली

माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडविली आहे. ‘ नरेंद्र मोदी हे जागतिक पातळीवरील उत्तुंग नेतृत्व आहे. ‘कोरोना’चा ( Covid2019 ) अंधार नाहीसा करण्यासाठी येत्या रविवारी ९ मिनिटे मेणबत्तीचा प्रकाश पाडणारा संदेश मोदी यांनी दिला आहे. याचा लाभ फक्त भारतापुरता मर्यादित ठेवू नका. तो जगभरात पोहचवा’, अशा शब्दांत सिन्हा यांनी मोदींच्या आवाहनाचा समाचार घेतला आहे. यशवंत सिन्हा हे माजी पंतप्रधान कै. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात देशाचे अर्थमंत्री होते. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून यशवंत सिन्हा हे सतत मोदी यांच्यावर तोफा डागत असतात. ‘कोरोना’च्या ( Covid2019 ) आपत्ती काळातही सिन्हा यांनी मोदींवर बाण सोडला आहे.

मेणबत्ती, दिवा मिळाला नाही तर ? : अनुराग काश्यप यांचा सवाल

ख्यातनाम चित्रपट निर्माते – दिग्दर्शक अनुराग काश्यप यांनीही तिरकस सवाल केला आहे. ‘ एक प्रश्न होता. मेणबत्ती आणि दिवा कुठे मिळेल ? औषधांच्या दुकानात की रेशनिंगवर की भाजीच्या दुकानात ? हे सुद्धा अत्यावश्यक सामानामध्ये सामाविष्ठ आहे का ? जर मिळाले नाही तर मग मी दुनिया जाळू शकतो का ? माझ्याजवळ काडीपेटी आहे. सहज विचारतोय.’ अशा शब्दांत काश्यप यांनी मोदी यांच्या ( Covid2019 ) आवाहनावर टोला हाणला आहे.

मोदीजी आम्हाला पुन्हा मुर्ख बनवू नका : ट्विटर ट्रेंड

‘कोरोना’च्या ( Covid2019 ) पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी मेणबत्त्या पेटविण्याचे आवाहन केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद ट्विटरवर उमटले आहेत. #ModijiDontMakeUsFoolAgain ( मोदीजी आम्हाला पुन्हा मुर्ख बनवू नका ) या नावाने ट्विटरवर ट्रेंड सुरू झाला आहे. तब्बल ७२ हजार लोकांनी या ट्रेंडखाली ट्विट्स केली आहेत.

हे सुद्धा वाचा

MARKAJ : मुस्लिमांचं काय करायचं ? ( संजय आवटे )

Covid19 : ‘टाळ्या वाजवणे, दिवे लावायला सांगणे हे पंतप्रधानांचे काम आहे का ?’

Corona : रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरोघरी दिवा लावूया

‘कोरोना’बाबत केंद्र सरकारने जारी केलेली अधिकृत माहिती

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी