28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजCorona : रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरोघरी दिवा लावूया

Corona : रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरोघरी दिवा लावूया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

लय भारी टीम
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भारतातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउनच्या काळात भारतीय दाखवत असलेल्या संयमाचे कौतुक केले. तसेच एकत्र येऊन कोरोनाला हरवण्यासाठी मोदींनी देशातील जनतेला शुक्रवारी सकाळी एका व्हीडिओ संदेशाद्वारे आवाहन केले. यावेळेस बोलताना मोदींनी भारतीयांकडे पाच एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरातील सर्व लाइट्स बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचे आवाहन केले. या माध्यमातून आपण कोरोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करु, असे मोदींनी म्हटले आहे.

कोरोनामुळे झालेला अंधार भेदून आपल्याला प्रकाशाकडे जायचे आहे. या अंधारातून कोरोनाला हरवण्यासाठी प्रकाशाला चारी दिशेला सोडायचे आहे. रविवार, दि. ५ एप्रिलला रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे घरातील सर्व लाईट बंद करून घराच्या दरवाजात किंवा बाल्कनीत मेणबती, दिवा, मोबाईलची फ्लॅश लाईट लावावी. सर्वजण मिळून कोरोनाच्या अंध:काराला मिटवूया. घरातील सर्व लाईट बंद असल्याने या दिव्यांचा प्रकाश चौफेर पडेल आणि आपण सर्वजण सोबत असल्याची भावना निर्माण होईल. यावेळी कोणीही एकत्र यायचे नाही. सोशल डिस्टन्सिंग तोडायचे नाही, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

देशातील कोट्यवधी लोक आज घरात आहेत. ते विचार करत असतील की एवढी मोठी लढाई आपण एकटे लढू. अजून असे किती दिवस असतील? आज लॉकडाऊन असले तरी कोणी एकटे नाही. १३० कोटी लोकांची सामूहिक शक्ती एकत्र आहे. वेळोवेळी या सामूहिक शक्तीच्या भव्यतेचे दर्शन घडवणे आवश्यक आहे. कोरोनाचे संक्रमण तोडण्यासाठी हाच एकमेव पर्याय आहे. प्रत्येकाने एकजुटीने संकटाशी मुकाबला करण्याची शक्ती मिळू दे अशी प्रार्थना करा. आपला उत्साह, ऊर्जा यापेक्षा जगात काहीच मोठे नाही, आपल्या या ताकदीने कोणते संकट आपल्याला हरवू शकत नाही. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहनही पंतप्रधान मोदींनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी