30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeराजकीयदत्तात्रय भरणे बोलले एक, अर्थ लावला भलताच

दत्तात्रय भरणे बोलले एक, अर्थ लावला भलताच

टीम लय भारी

मुंबई : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे ‘मुख्यमंत्र्यांना मरू द्या’ असे बोलल्याचा जोरदार प्रचार सुरू आहे. वास्तवात, कान शाबूत ठेवून त्यांचे हे वाक्य पुन्हा पुन्हा ऐकले तर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह अर्थाने बोललेलेच नाहीत, हे लक्षात येईल  (Dattatraya spoke of filling one, better understood).

सोलापूरमधील संबंधित कार्यक्रमात राज्यमंत्री भरणे यांनी गार्डन बनविण्यासाठी नगरोत्थान योजनेतून १ कोटी रुपये देण्याची घोषणा केली. त्यासाठी लवकर प्रस्ताव पाठवा अशी सुचना भरणे यांनी महापौरांना केली. ‘मुख्यमंत्र्यांकडून निधीसाठी प्रयत्न करता येईल, अशा आशयाची माहिती महापौर श्रीकांचना यल्लमा देत होत्या. त्यावर दत्तात्रय भरणे म्हणाले की, ‘मुख्यमंत्र्यांचं (म्हणजे मुख्यमंत्र्यांकडील निधीचे) जाऊदे… मरू दे… मुख्यमंत्र्यांकडून आपण आणखी मोठा निधी आणू. आता गार्डनसाठी १ कोटी रुपयांचा तात्काळ निधी मंजूर करतो. त्यासाठी तुम्ही लवकर प्रस्ताव पाठवा.’

मनसेचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा, पण टास्क फोर्सच्या खांद्यावर बंदूक ठेवून

राज्यपाल म्हणाले, अजित पवार माझे मित्र

वास्तवात, मुख्यमंत्र्यांकडून मोठ्या निधीसाठी प्रयत्न करूयात. हा १ कोटीचा निधी नगरोत्थान योजनेतून मंजूर करूयात, असा भरणे यांच्या बोलण्याचा स्पष्ट अर्थ आहे. जाऊद्या… मरूद्या हे वाक्य भरणे यांनी निधीशी संबंधित व्यक्त केल्याचे लक्षात येते. पश्चिम महाराष्ट्रात ‘मरू दे’ शब्द जाऊ द्या, राहू द्या या अर्थाने सर्रासपणे वापरला जातो. ग्रामीण बोली भाषेत भरणे यांनी हे वाक्य निधीशी संबंधित वापरले होते. किंबहूना गार्डनचे काम तात्काळ सुरू व्हावे म्हणून ते १ कोटी रुपये लगेचच मंजूर करून देण्याचे आश्वासन देत आहेत. मुख्यमंत्र्यांविषयी त्यांनी कुठेही अनाधर केलेला नाही. सोलापूरकरवासियांना तातडीने ते निधी देऊ इच्छितात. पण भरणे यांच्या वाक्याचा अनर्थ करण्यात आला. एवढेच नव्हे तर, त्यांची निष्कारण बदनामीही करण्यात येत आहे (Bharne’s sentence was misinterpreted).

Dattatraya spoke of filling one, better understood
दत्तात्रय भरणे

मंत्री दत्तात्रय भरणेंची जादू, MPSC च्या फाईलवर राज्यपालांची दोन तासांतच स्वाक्षरी

Days after Gadkari’s letter, Ajit Pawar says will ascertain facts as Maharashtra CM Uddhav Thackeray insists on quality works

अजित पवारांचाही संदर्भ चुकीच्या पद्धतीने जोडला

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याअगोदर नगरसेवक चंदनशिवे यांचे भाषण झाले होते. चंदनशिवे यांनी भरणे यांचे तोंड भरून कौतुक केले. तुम्हाला भविष्यात मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल अशा भावना चंदनशिवे यांनी व्यक्त केल्या होत्या. त्यावर भरणे यांनी ‘माझे नेते अजित पवार आहेत. तुम्हाला जो काय आशिर्वाद द्यायचा असेल तो अजितदादांना द्या’ असे भरणे बोलले होते.

राज्यमंत्री भरणे यांनी अजितदादा पवार आणि मुख्यमंत्र्यांकडील निधी हे दोन्ही मुद्दे वेगवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या संदर्भात व्यक्त केले होते. पण काही खोडसाळ व्यक्तींनी दोन्ही मुद्दे एकत्र जोडले, व दत्तात्रय भरणे यांची निष्कारण बदनामी केल्याचेही दिसून येत आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी