32 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रमनसेचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा, पण टास्क फोर्सच्या खांद्यावर बंदूक ठेवून

मनसेचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा, पण टास्क फोर्सच्या खांद्यावर बंदूक ठेवून

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांना आभार माननारे तसेच टास्क फोर्सच्या कामात काही गोष्टींचा सहभाग करण्याचे सल्ले देणारे पत्र लिहीले आहे (MNS writes letter to Corona Task Force President).

गेल्या पंधरा महिन्यांपासून संपुर्ण महाराष्ट्र टाळेबंदीमध्ये अडकला आहे. टाळेबंदीचा निर्णय किंवा निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय हा टास्क फोर्सच्या सल्ल्यांनुसारच घेतला जातो. म्हणून, टास्क फोर्सने केलेल्या कार्याचे आभार माननारे तसेच काही सल्ले देणारे पत्र मनसे सरचिटणीसांनी लिहिले.

‘कोरोना’चे महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे का ? : मनसेचा सवाल

मनसेने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार!

टास्क फोर्समध्ये तज्ञ डॉक्टर मंडळींसोबत अर्थतज्ञ, वैज्ञानिक, माहिती विश्लेषक (Data analyst), शिक्षण तज्ञ, अश्या लोकांचा समावेश करा. कारण या महामारीमुळे होणाऱ्या परिणामांना आता फक्त वैज्ञानिक दृष्ट्या बघणे आता सोयीचे ठरणार नाही. लाखो लोकांचे रोजगार बुडाले, उद्योगधंदे डबघाईला आले, बँकांचे हप्ते थकले, अर्थचक्र ठप्प झाले. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जगण्यावर परिणाम होत आहे. परंतु या सगळ्या बाबींवर दुर्लक्ष होत असल्याचे माझ्या लक्षात आले आहे, असे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितले (This was stated by General Secretary Sandeep Deshpande).

हे बदल का करावे? ह्या गोष्टींचा टास्क फोर्समध्ये समावेश का करावा? हे स्पष्ट करत त्यांनी काही उदाहरणे दिली आहेत. रेल्वे, रस्ते, विमान प्रवासात अनेकजण जखमी होऊन मृत्यू पावतात. त्यामुळे, आपण कधी प्रवास करणे थांबवतो का? उलट धोके ओळखून ते कसे टाळता येतील याचा विचार आपण करतो.

MNS writes letter to Corona Task Force President
टास्क फोर्स मध्ये वैद्यकीय तज्ज्ञांसोबत शिक्षण, रोजगार, उद्योग, अर्थचक्र यांवरील तज्ज्ञांचा समावेश करण्यासाठी केली मागणी

“आमचा सीएम जगात भारी”, मुख्यमंत्र्यांवर मनसेचा खोचक पण मजेशीर टोला

Time to save young generation from power hungry people: Raj Thackeray in Mumbai

तसेच टाळेबंदीचा उपयोग हा रोगप्रसार थांबवण्यासाठी नाही तर, व्यवस्था उभी करण्यासाठी केला पाहिजे. आपण जर ठरवले की आपल्याला कोरोनाचा धोका कमी करून सर्व चालू करायचे आहे तर, आपल्याला अनेक मार्ग मिळू शकतील. त्यासाठी विचारात सकारत्मकता आणली पाहिजे.

शिक्षण, उद्योग, रोजगार, अर्थचक्र पुन्हा सुरळीत सुरू करण्यासाठी टास्क फोर्समध्ये या विषयातील तज्ज्ञांचा समावेश केला पाहिजे. टास्क फोर्स विषयी कोणतीही शंका मनात न ठेवता, लोकांशी चर्चा करून त्यांनी समोर ठेवलेली मते लक्षत घेऊन, त्यांना एकत्रित करून मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

डेल्टा प्लसची तिसरी लाट यायची जोरदार तयारी सुरू आहे. पुन्हा जर टाळेबंदी झाली तर लोकांच्या सहनशक्तीचा अंत होईल अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. टास्क फोर्स या सगळ्या मुद्यांवर सर्व दृष्टिकोनातून निश्चित विचार केले जातील असा विश्वास त्यांनी दर्शवलाय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी