28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeमुंबईउद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर तिन्ही पक्षांचे एकमत, पण चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर तिन्ही पक्षांचे एकमत, पण चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : सत्ता स्थापनेबाबत चर्चेच्या सगळ्या मुद्द्यांवर तिन्ही पक्षांचे एकमत झालेले आहे. आता फक्त सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांची भेट घेणे एवढीच औपचारिकता उरली आहे, असे वाटत असतानाच चर्चेचे गुऱ्हाळ आणखी लांबले आहे. तिन्ही पक्षांचे एकमत होण्यासाठी अजून किमान एक दिवस लागेल असे सूत्रांनी सांगितले. परंतु मुख्यमंत्रीपदाबाबत तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व तिन्ही पक्षांनी मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्षांचे पद कुणाला द्यायचे यावरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. वरळी येथील नेहरू सेंटर या ठिकाणी ही बैठक झाली. या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार, उद्धव ठाकरे, अहमद पटेल, मल्लिकार्जून खर्गे यांचा समावेश होता.

या बैठकीनंतर शरद पवार यांनीही पत्रकारांशी बोलताना, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर एकमत झाले आहे. काही मुद्द्यांवर अद्याप चर्चा सुरू आहे. परंतु त्यावर उद्या तोडगा निघेल असे सांगितले. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांनीही बाहेर पडल्यानंतर चर्चा सकारात्मक झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

विधानसभाध्यक्षपदांवरून रस्सीखेच

विधानसभेचे अध्यक्षपद आपल्याकडेच हवे अशी मागणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रसने केली आहे. काँग्रेसचे आमदार कमी आहेत. त्यामुळे त्यांना अगोदरच मंत्रीपदे कमी देण्यात आली आहेत. आता विधानसभा अध्यक्षपद तरी मिळावे असे काँग्रेसचे म्हणणे आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण या दोघांपैकी कुणा एकाचे तरी पुनर्वसन करण्यासाठी विधानसभाध्यक्षपदाचा आग्रह काँग्रेसने केला असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

आमदार कमी असले तरी सत्तेच्या वाट्यासाठी मागे हटायचे नाही

आपले आमदार कमी आहेत. परंतु आपल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही. त्यामुळे पुरेशी पदे पदरात पाडून घेताना मागे हटू नका असे स्पष्ट आदेश काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या पक्षांच्या नेत्यांना दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे नेते अध्यक्षपदाच्या मागणीवर अडून राहिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

अण्णा हजारेंमुळे राजकीय करिअर उद्ध्वस्त झालेल्या ‘या’ नेत्याचे मंत्रीमंडळात होणार पुनरागमन

सरकार स्थापनेचा आजच दावा, नव्या सरकारमध्ये ‘अशी’ असतील मंत्रीपदे

महाराष्ट्र विकास आघाडीला ‘हे’ मिळाले नवीन भिडू

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी