27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeराजकीयडाॅ.तुषार शेवाळे यांचा भाजपात प्रवेश ; सहा वर्षांसाठी निलंबन

डाॅ.तुषार शेवाळे यांचा भाजपात प्रवेश ; सहा वर्षांसाठी निलंबन

काॅग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व धुळे लोकसभेची उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले डाॅ.तुषार शेवाळे यांनी अखेर रविवारी (दि.१२) पक्षाचा हात सोडत भाजपात प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या धामधुमित त्यांनी पक्ष सोडल्याने काॅग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, पक्षाने त्यांचे सहा वर्षांसाठी निलंबन केले आहे. धुळे लोकसभा मतदारसंघ उमेदवारीवरुन काॅग्रेसमध्ये मोठे घमासान पहायला मिळाले होते. डाॅ.तुषार शेवाळे हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. तशी इच्छाही त्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. मात्र, पक्षाने त्यांच्याऐवजी माजी मंत्री डाॅ.शोभा बच्छाव यांना लोकसभेसाठी संधी दिली.

काॅग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व धुळे लोकसभेची उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले डाॅ.तुषार शेवाळे (Dr Tushar Shewale) यांनी अखेर रविवारी (दि.१२) पक्षाचा हात सोडत भाजपात (BJP) प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या धामधुमित त्यांनी पक्ष सोडल्याने काॅग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, पक्षाने त्यांचे सहा वर्षांसाठी निलंबन (Six-year suspension) केले आहे. धुळे लोकसभा मतदारसंघ उमेदवारीवरुन काॅग्रेसमध्ये मोठे घमासान पहायला मिळाले होते. डाॅ.तुषार शेवाळे (Dr Tushar Shewale) हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. तशी इच्छाही त्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. मात्र, पक्षाने त्यांच्याऐवजी माजी मंत्री डाॅ.शोभा बच्छाव यांना लोकसभेसाठी संधी दिली.(Dr Tushar Shewale joins BJP Six-year suspension)

उमेदवारी नाकारल्याने त्यांनी तत्काळ जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. मात्र पक्षानेही त्यांचा राजीनामा स्विकारत त्यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करत माजी आमदार शिरिष कोतवाल यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली. त्यामुळे डाॅ.शेवाळे (Dr Tushar Shewale) आणखी दुखावले. नाशिक येथील काॅग्रेस भवनात बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी उघड नाराजी बोलून दाखवली होती. पण आपण पक्षाचे काम करत राहू असे देखील सांगितले. पण त्यास महिना लोटत नाही तोच डाॅ.शेवाळे य‍ांनी काॅग्रेसचा हात सोडत भाजपात (BJP) प्रवेश केला. त्यांचा हा प्रवेश काॅग्रेससाठी मोठा धक्का असून धुळे लोकसभा मतदारसंघात त्याचा फटका बसण्याची चिन्हे वर्तवली जात आहे.

बावनकुळे यांची घेतली होती भेट
डाॅ.तुषार शेवाळे (Dr Tushar Shewale) यांनी तीन महिन्यांपुर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच ते लवकरच भाजपात जातील अशी चर्चा होती. मात्र लोकसभा लढविण्यासाठी ते इच्छूक असल्याने काॅग्रेसमध्ये थांबले होते. मात्र तिकिटच नाकारल्याने त्यांनी भाजपात जाण्याचा (BJP) निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी