31 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeराजकीयमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडून पुरग्रस्तांना दिलासा

मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडून पुरग्रस्तांना दिलासा

टीम लय भारी

मुंबई:- संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुर परिस्थीती उद्भवलेली आहे. नागरिकांना सर्व सोईसुविधा उपलब्ध होतील यासाठी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम स्वतः जातीने संपूर्ण परिस्थीती वर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच पूरग्रस्तांना लागेल आणि जमेल तशी मदत होईल असा दिलासा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिला आहे (Dr. Vishwajeet Kadam gave relief to the flood victims).

सांगली आणि कोल्हापूर येथे अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती झाली आहे. बचाव कार्य, आरोग्यसेवा, खाद्यपदार्थ व्यवस्था यासर्व गोष्टी नागरिकांना उपलब्ध करून देत आहेत. तसेच वेळोवेळी संपूर्ण परिस्थितीचा ते आढावा घेत आहेत. तसेच मी स्वतः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्कात आहे. असे त्यांनी सांगितले आहे.

दुर्गंधी जाईल, इतिहास राहील (डॉ. जितेंद्र आव्हाड)

‘कोरोना’मुळे विद्यार्थ्यांचा भार हलका, शिक्षणात पंचवीस टक्के कपात; वर्षा गायकवाडांची माहिती

कोयना धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या ६ वक्र दरवाजे १० फुटांपर्यंत उचलण्यात आले असून त्यातून जवळपास ४४ हजार ६२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे यामुळे कृष्ण नदीची पाणी पातळी जवळपास ४५ फुटं इतक्या धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून अलमट्टी धरणातून जास्तीत जास्त पाण्याचा विसर्ग करण्याबाबत कर्नाटक सरकारच्या संपर्कात आहोत. असेही त्यांनी सांगितले आहे.

Dr. Vishwajeet Kadam gave relief to the flood victims
चिपळूण येथील पूरपरिस्थिती

खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून या बाबतीत मी स्वतः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला आहे. सर्व शासकीय यंत्रणांना सतर्क राहून सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुर बाधीत क्षेत्रातील नागरीकानी अत्या आवश्यक तेवढेच साहित्य सोबत घेऊन सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे असे आवाहन देखील यावेळी डॉ. विश्वजीत कदम यांनी केले आहे (Dr. Vishwajeet Kadam said he had personally contacted Chief Minister Uddhav Thackeray and Guardian Minister Jayant Patil over the phone).

मुख्यमंत्र्यांची घोषणा; अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्या नातलगांना 5 लाखाची मदत

Flood victim’s kin to get additional ₹ one lakh: Maharashtra Chief Minister Prithiviraj Chavan

सांगली सह कोल्हापूर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील कोयना तसेच कृष्णा, पंचगंगा आदी नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या मुळे नदी काठावरील गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक, नुकसान झाले असून लोकांचे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाविश्वजीत ले आहे. नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. असे डॉ. कदम यांनी सांगितले (The administration has been instructed to evacuate the citizens to safer places. That’s what Dr. Vishwajeet Kadam said).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी