27 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
Homeमुंबईदोन वर्षांनी मुंबईकरांची "दिलसे दौड"

दोन वर्षांनी मुंबईकरांची “दिलसे दौड”

करोनानंतर तब्बल दोन वर्षांनी मुंबईत (Mumbai) आयोजित करण्यात आलेल्या टाटा मॅरेथॉन (Marethon) स्पर्धेत स्पर्धकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत तब्बल तब्बल ५५ हजारांहून अधिक धावपटू सहभागी झाले होते. हजारो मुंबईकरांनी ‘हर दिल मुंबई’ चा नारा देत धावायला सुरुवात केली. सकाळी ५ वाजून १५ मिनीटांनी या स्पर्धेला सुरूवात झाली. पूर्ण मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन, दहा किलोमीटर धाव, ड्रीम रन, सीनिअर सिटीझन्स रन आणि चॅम्पियन विथ डिसॅबिलिटी रन आदी विभागांमध्ये हजारो धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. मुंबई मॅरेथॉन’चे यंदा १८वे वर्ष आहे. इथिओपियाच्या हायले लेमी याने पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा जिंकली आहे. त्याने २ तास ०७ मिनिटं २८ सेंकदात पूर्ण केली आहे. तर केनियाच्या फिलेमन रोनो याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याने हे नंतर २ तास ८ मिनिटे ४४ सेकंदात पूर्ण केले. इथोपियाचाच हेलू झेदू तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. २ तास १० मिनिटे २३ सेकंदात त्याने हे अंतर पार केले. (Ethiopians sweep men’s full marathon)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून (Chatrapati Shivaji Maharaj Terminus) ही मॅरेथॉन सुरू झाली तर अर्ध मॅरेथॉन ही माहीम रेती बंदरहून सुरू झाली. ‘हर दिल मुंबई’ असे या मॅरेथॉनचे ब्रीदवाक्य होते. बॉलिवूडचा अभिनेता टायगर श्रॉफ हा या मॅरेथॉनचा ब्रँड अँबेसेडर होता. तरुणांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी टायगरला मॅरेथॉनचा ब्रँड अँबेसेडर बनविण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे धावपटूदेखील या स्पर्धेत सहभागी झाले होते.

हे सुद्धा वाचा

आम्हीही मातोश्रीवर खोकेच पोहोचवले आहेत..!

नेपाळमध्ये विमान अपघातात ४० ठार

बनावट कामगार नेत्यांचे कंबरडे मोडा; देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश

भारतीय जनता पक्षाचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी हाफ मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. माहीम येथे ढोलताशांच्या गजरात या मॅरेथॉनला सुरुवात झाली. या मॅरेथॉनमध्ये १४ हजार मुंबईकर सहभागी झाले आहेत. मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलिस आणि आयोजकांनी जागोजागी लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. मॅरेथॉनदरम्यान कुठलाही अनिश्चित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. दक्षिण, मध्य आणि पोलिसांच्या पश्चिम विभागातील स्थानिक पोलिसांबरोबरच ५४० अधिकारी, ३१४५ पोलिस कर्मचारी, राज्य राखीव पोलिसांच्या १८ तुकड्या, १८ जलद गती दलाची पथके, वाहतूक पोलिस,चार दंगल पथके, वॉर्डन असा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता.

धावत्या लोकलमध्ये मॅरेथॉनचा सराव
मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक येण्यासाठी सर्वच स्पर्धक कसून सर्व करत असतात. पण ही स्पर्धा जिकंण्यासाठी काही अतिउत्साही तरूणांनी चक्क धावत्या लोकलमध्ये दरवाजानजीकच सराव करण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ सर्व ठिकाणी व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या अतिउत्साही स्पर्धकांवर टीकेची झोड उठवली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी