29 C
Mumbai
Wednesday, August 30, 2023
घरराजकीयविधानसभेसाठी गोपीचंद पडळकरांनी ठोकला शड्डू; मतदारसंघ देखील निवडला !

विधानसभेसाठी गोपीचंद पडळकरांनी ठोकला शड्डू; मतदारसंघ देखील निवडला !

भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर आता थेट जनतेतून निवडून येऊन विधानभवनात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. याबाबत खुद्द पडळकरांनीच घोषणा केली आहे. पडळकर यांनी यापूर्वी बारामतीमधून अजित पवार यांच्या विरोधात निवडणुक लढविली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. आता मात्र पडळकरांनी बारामती मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघातून तयारी सुरु केली आहे.

गोपीचंद पडळकर आता खानापूर (जि. सांगली) मतदार संघातून निवडणुक लढविण्याच्या तयारीत आहेत. खानापूर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आहेत. सध्या ते एकनाथ शिंदे यांच्या गटात असून तेथे सदाशिव पाटील काँग्रेसचे माजी आमदार देखील याच मतदारसंघातून यापूर्वी निवडून आले होते. सध्या भाजप, शिंदे गट, अजित पवार गट आगामी निवडणुका एकत्र लढण्याची शक्यता आहे. पडळकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे समजले जातात. बारामती ऐवजी दुसऱ्या मतदार संघातून निवडणुक लढविण्यासाठी पडळकर तयारी करत आहेत.

हे सुद्धा वाचा 
दहीहंडी उत्सव : गोविंदासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय !
बाळासाहेब ठाकरे असते तर नितीन गडकरींना कडकडून मिठी मारली असती; अनिल गोटे नेमके काय म्हणालेत ? 
शरद पवारांच्या मदतीला उद्धव ठाकरे धावले !

खानापूर तालुक्यातील ऐनवाडी येथे तामखडी ते ऐनवाडी २० लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ पडळकर यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले, खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती 2024 च्या निवडणुकीत बदलायची आहे. त्यामुळे 100 टक्के ताकदीने विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. 2024 ची विधानसभा निवडणूक खानापूर विधानसभा मतदारसंघातून लढविण्याची घोषणा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. तसेच आजी – माजी आमदारांना खुेल आव्हान देत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी