33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयकसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीत राडा, भाजपच्या माजी नगरसेवकाचा मतदारावर हल्ला

कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीत राडा, भाजपच्या माजी नगरसेवकाचा मतदारावर हल्ला

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज २६ फेब्रुवारीला मतदान पार पडत आहे. या निवडणुकीला आज सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी आपले दिग्गज नेते प्रचारात उतरवले होते. कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात चुरस आहे. या निवडणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सरकारने अत्यंत कडक पोलीस बंदोबस्त लावला आहे. केंद्रीय राखीव दलाच्या पाच कंपन्या आणि पोलीस कर्मचारी, अधिकारी या मतदारसंघात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. मात्र असे असतानाही या निवडणुकीला भाजपच्या माजी नगरसेवकाच्या कृत्याने अखेर गालबोट लागले आहे. भाजपच्या नगरसेवकाने एका मतदारावर आपल्या कार्यकर्त्यांसह हल्ला केल्याची घटना घडली आहे. पण याबाबत अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

गंजपेठेमध्ये हा हल्ल्याचा प्रकार घडला आहे. भाजपचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर आणि त्यांच्या कार्यकर्त्याने आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप संबंधित मतदाराने केला आहे. हरिहर हे या परिसरातील माजी नगरसेवक आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही. दरम्यान, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतही राडा झाल्याची माहिती मिळत आहे. माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. पिंपळ गुरव माध्यमिक विद्यालय मतदान केंद्राबाहेर समर्थकांत हा राडा झाल्याची माहिती मिळत आहे.

पराभवाच्या भीतीने सत्ताधारी बिथरले 
कसबा आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही मतदारसंघात हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांसाठी या पोटनिवडणुका अत्यंत प्रतिष्ठेच्या असल्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण दिसत आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला असून पराभवाच्या भीतीने हे सर्व प्रकार घडवून आणले जात असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, “कसबा आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही मतदार संघात चार ते पाच मंत्री ठाण मांडून बसले आहेत. प्रशासन आणि यंत्रणांवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे.” यामागे भाजपचे राजकारण असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे. सत्ताधाऱ्यांना आपला पराभव दिसत असल्यामुळे ते लोकांना गोंधळ घालण्यास प्रवृत्त करत आहेत. असं राजकारण यामागे दिसून येत असून सकाळपासून काही गोष्ट स्पष्ट दिसत आहेत, अशी प्रतिक्रिया सांज राऊत यांनी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

मोठी बातमी : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव झाले; केंद्र सरकारने दिली मंजुरी !

मविआने उमेदवार मागे घेतल्यास टिळक कुंटुंबातील व्यक्तीला भाजपची उमेदवारी!

ब्राम्हणेतर व्यक्तीला उमेदवारी दिली, आता भोगा परिणाम ! हिंदू महासंघाच्या आनंद दवेंचा भाजपला थेट इशारा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी