33 C
Mumbai
Friday, May 19, 2023
घरमुंबईसरकार चहामध्ये सोन्याचा अर्क टाकते का ? ; अजित पवार यांची टीका

सरकार चहामध्ये सोन्याचा अर्क टाकते का ? ; अजित पवार यांची टीका

मागील चार महिन्यांत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानावरील जेवणाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये आले आहे. सरकार चहामध्ये सोन्याचा अर्क टाकते का? असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्ताधारी पक्षावर केली आहे. सरकारच्या उधळपट्टीवर अजित पवार यांनी उपरोधिक टीका किती आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी असलेल्या निधीचे वाटप झालेले नसताना सरकारकडून जाहिरातबाजीवर उधळपट्टी करण्यात येत आहे. आर्थिक वर्ष आता संपत आले असून हा निधी परत जाण्याची शक्यता आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. (Does-the-government-put-gold-extract-in-tea-criticism-of-ajit-pawar)

विकासकामांपेक्षा सरकारी उधळपट्टीवर निदही खर्च होत असल्याचा आरोप अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. ते म्हणाले, सत्ताधारी पक्ष विकासकमांमध्ये राजकारण करत असल्यामुळे विकासाच्या प्रक्रियेवर परिणाम होत आहे. मागील अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्यात आल्यामुळे विकासकामे ठप्प पडली आहेत. जिल्हा वर्षिक योजनेचे किती पैसे खर्च झाले, याची माहिती काढावी. अजिबात पैसे खर्च झालेले नाहीत. निधीचे वितरण नाही. सरकार तिथे लक्ष देण्यास कमी पडले आहे,” असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

“विकासकामांऐवजी इतर गोष्टींवर उधळपट्टी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावरील जेवणाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये आलेले आहे. मी उपमुख्यमंत्री होतो. चार महिन्यात जेवणाचं बील २ कोटी ३८ लाख रुपये आले. एवढं बील कसं काय आले? चहामध्ये सोन्याचं पाणी वगैरे घातलं होतं का? सरकार चहात सोन्याचा अर्क टाकते का?” अशा उपरोधिक शब्दांत अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

हे सुद्धा वाचा

मी औरंगाबादमध्ये जन्मलो आणि औरंगाबादमध्येच मरणार ! इम्तियाझ जलील

कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीत राडा, भाजपच्या माजी नगरसेवकाचा मतदारावर हल्ला

वर्क फ्रॉम होम नकोच : ‘इन्फोसिस’चे संस्थापक नारायण मूर्ती

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी