देशामध्ये राम मंदिर बांधण्यासाठी अनेक वर्षांपासून हिंदू तरूणांनी तसेच काही नेत्यांनी त्यावेळी लढा उभारला होता. यामध्ये बाबरी मशीद प्रकरण न्यायालयामध्ये अनेक वर्षांपासून पाहायला मिळतच होतं. त्यावेळी बाबरी मशीद प्रकरण हे न्यायालायामध्ये सुरू होतं, त्यावेळी इक्बाल अंसारी यांच्याकडे सर्वांचं लक्ष होतं. कारण ते बाबरी मशीदीकडून पक्षकर होते. २०१६ मध्ये इक्बाल यांचे वडील हाशिम अंसारी याचं निधन २०२६ मध्ये झालं असून त्यानंतर मुलगा इक्बाल अंसारी (Iqbal ansari) यांनी बाबरी मशीदीच्या (Babri masjid) प्रकरणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. दरम्यान शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आयोध्येमध्ये आले असता, नरेंद्र मोदींवर अंसारी यांनी फुलांचा वर्षाव केला. आता राम मंदिराचे निमंत्रण मिळाल्यास जाणार असल्याची टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. (ayodhya)
रामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी निमंत्रण आल्यास आपण जाणार असल्याचं अंसारी म्हणाले आहेत. आता आयोध्यामध्ये पूर्वीसारखा हिंदू मुस्लिम वाद राहिला नसल्याचं अंसारी म्हणाले आहेत. आम्ही सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय स्विकारला आहे. अशातच आता आयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलं आहे. याचा मला अभिमान वाटतोय. आयोध्येमध्ये कधीच हिंदु मुस्लिम दंगे होणार नसल्याचं अंसारी म्हणाले आहेत. सर्वोच्च न्यायालयातून निर्णय आला आणि मंदिर उभं राहिलं. आमच्यासाठी हा विषय संपला आहे, असं बाबरीचे पक्षकार इक्बाल अंसारी यांनी टीव्ही ९ शी बोलत असताना सांगितलं आहे.
#WATCH | Former Litigant in Ayodhya land dispute case advocate Iqbal Ansari says, ” Ayodhya’s land is unparalleled. Today PM Modi has come to our place, it is our duty to welcome guests…” pic.twitter.com/pr4NEUsHYF
— ANI (@ANI) December 30, 2023
हे ही वाचा
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना ठरवलं नामर्द
विक्रोळीत महात्मा ज्योतिबा फुले रूग्णालयाचा पुनर्विकास टांगणीला
इक्बाल अंसारी याच्याकडून नरेंद्र मोदींच कौतुक
इक्बाल अंसारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोध्येचा विकास झाला पाहिजे. आयोध्येत आधी केवळ एकच लहान रेल्वेस्थानक होते. आता तीन मजली रेल्वे स्थानक तयार करण्यात आलं आहे. आयोध्येमध्ये सर्व बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाला आहे. मोदींचा ताफा माझ्या घराजवळून गेला तेव्हा मी त्यांच्यावर फुलं उधळून त्यांचं स्वागत केलं असल्याचं इक्बाल अंसारी म्हणाले आहेत.