29 C
Mumbai
Wednesday, January 31, 2024
Homeमनोरंजनकपील शर्माला हार्ट अटॅक वाले पराठे खाऊ घातल्याने दुकानदाराला पडलं महागात

कपील शर्माला हार्ट अटॅक वाले पराठे खाऊ घातल्याने दुकानदाराला पडलं महागात

पंजाबमध्ये जालंधरमध्ये पराठे हा पदार्थ सर्वाधिक लोकप्रिय आहे. याच मॉडल टाऊनमध्ये मिळणारे हार्ट अटॅक वाले पराठ्याची चर्चा जालंधरमध्ये सर्वाधिक होत आहे. सोशल मीडियावर हे पराठे व्हायरल होत असून अनेकांनी या पराठ्यांचा अस्वाद घेतला आहे. या दुकानाचा मालक वीर दविंदर सिंह याने कॅमेडी स्टार कपील शर्मा आणि पत्नी गिन्नी यांना वीरने पराठे खाऊ घातले आहेत. यावेळी पराठ्याचं दुकान रात्र उशीरापर्यंत सुरू होते. कपील शर्मा आणि गिन्नीला पराठे खाऊ घालण्याच्या नादात पोलिसांनी वीरवर कलम १८८ अंतर्गत एफआरआय दाखल केली आहे. वीरवर मारहाणी आणि रूममध्ये बंद करत गैरवर्तन केल्याचा आरोप केला गेला आहे.

घडलेली घटना पत्रकार परिषदेत उघड

जालंधर प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. वीर दविंदर सिंहने एसएचओ अजायब सिंह यांच्यावर गंभीर आरोप केला होता. तो म्हणाला की ‘जालंधर येथे माझं दुकान आहे. मी दुकानावर पराठे विकून माझ्या घराचा गाडा चालवत आहे. रात्रीच्या वेळी मॉडल टाऊन येथे माझं दुकान असून त्यावेळी कपील शर्मा आणि त्यांचा परिवार पराठे खाण्यासाठी आला होता. हे कळताच काही एसएचओ यांनी मला मारहाण केली आणि खोलीत बंद करून  अनेक तासांपर्यंत मला मारहाण केली आणि खोलीमध्ये बंद केलं असल्याची माहिती वीरने दिली आहे. त्याचप्रमाणे माझ्यासोबत गैरवर्तवणूक करण्यात आली असल्यानं एचआयओंवर कडक कारवाई व्हावी अशी माहिती त्याने पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. यावर आता पोलिसांनी आपली बाजू मांडली आहे.

हे ही वाचा

राम मंदिराचा विरोध करणाऱ्या इक्बाल अंसारींची मोदींवर फुलांची उधळण

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना ठरवलं नामर्द

रामायणातील ‘लक्ष्मण’ रूसला

काय म्हणाले पोलीस?

मॉडेल टाऊनजवळ राहणाऱ्या काही स्थानिकांनी तक्रार केली की, वीर रात्री १० ते २ पर्यंत पराठ्याचं दुकान चालवतो. लोकं दुरहून पराठे खाण्यासाठी येत असून येथे गर्दी करतात. त्यामुळे परिसर घाण होऊन कचरा पसरत आहे. एसपी यांनी देखील वीरला समजावलं होतं. पण तरीही त्याने ऐकलं नाही. मग पोलिसांना त्याच्या घरी पाठवावं लागलं आहे. त्यावली गैरवर्तणूक केली आहे. त्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी