32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeक्राईमनाशिकमध्ये प्राणघातक हल्ला करणाऱ्या टोळीला दिल्लीत अटक

नाशिकमध्ये प्राणघातक हल्ला करणाऱ्या टोळीला दिल्लीत अटक

उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या बहेनवाल गँगच्या म्होरक्यासह तीन संशयितांना दिल्ली येथून गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. बहेनवाल गॅंगचे सर्व सदस्य हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गँगवर देखील मोक्कान्वये कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाश्यानी केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, शुक्रवार दि. १६ रोजी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धर्मनाथ अपार्टमेंट समोर, सम्राट चौक, भिम नगर येथे फिर्यादी मयुर विजय रोहम, २९, रा. उत्सव विहार अपार्टमेंट, भीमनगर, जेलरोड, नाशिकरोड हे थांबलेले असतांना पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार मधुन आलेले विजय सरजीत बहेनवाल उर्फ छंग्या, रा. फर्नांडिसवाडी, जयभवानी रोड, राहुल उज्जैनवाल, गणेश सोनवणे आणि त्याच्या इतर साथीदारांनी हल्ला केला होता

मयूर रोहम यांना तेरा भाई मयूर बेद और रोहित महाले किधर हे असे विचारून मागील भांडणाची कुरापत काढुन हाताच्या बुक्क्याने पोटात व छातीत मारले तसेच हातातील धारदार चॉपरने जीव घेण्याच्या उद्देशाने वार केल्याची घटना घडली होती. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.संशयितांनी रोहम यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले होते. या गुन्ह्याचा गुंडा विरोधी पथक तपास करत असताना गुन्हयातील सर्व संशयितांचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारवर संशयित विजय बहेनवाल उर्फ छंगा, राहुल उज्जैनवाल, गणेश सोनवणे आणि इतर संशयित हे आपले अस्तित्व लपवुन राजस्थान, हरियाणा त्यानंतर दिल्ली येथे पळुन गेल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे गुंडा विरोधी पथक प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, डी. के. पवार, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत यांनी दिल्ली गाठली. संशयित हे दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन जवळ असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने याठिकाणी सापळा रचून संशयित विजय उर्फ छंगा सरजीत बहेनवाल, राहुल अजय उज्जैनवाल, प्रदिप उर्फ गणेश विठ्ठल काळे, गणेश उर्फ गौरव सुनिल सोनवणे यांना शिताफीने अटक केली आहे.
हि कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, डी. के. पवार, राजेश सावकार, सुनील आडके, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, गणेश नागरे, नितीन गौतम, निवृत्ती माळी, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी