28 C
Mumbai
Saturday, June 22, 2024
Homeराजकीयएकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घ्यावा; माजी मुख्यमंत्र्यांची मागणी

एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घ्यावा; माजी मुख्यमंत्र्यांची मागणी

जालन्यातील मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्यानंतर राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकारविरोधात सर्वत्र संतप्त भावना असून विरोधकांनी देखील राज्य सरकारच्या बेफिकीरीवर बोट ठेवले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जप्रकरणी सरकारवर टीका केली असून त्यांनी या घटनेला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीसांना जबाबदार धरले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी लाठीचार्जच्या घटनेचा निषेध नोंदवत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. पण आता तर हे शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. आंदोलन दडपण्याचे आदेश मुंबईतून दिले असल्याचे कळते. या निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे.

गेल्या काही वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी लढा देत आहे, मात्र सरकारने त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याशिवाय कोणतेच काम केलेले नाही, त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी आरक्षणासाठी उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र पोलिसांनी लाठीचार्ज करत हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला. राज्यात अनेक ठिकाणी या घटनेचे पडसाद उमटले. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना समोर आल्या.
हे सुद्धा वाचा 

जालना लाठीचार्जप्रकरणी भाजपाने माफी मागावी: सुप्रिया सुळे
राज ठाकरेंनी मराठा आंदोनलावरुन राज्याच्या कारभाऱ्यांना सुनावले; म्हणाले….
शरद पवार मराठा आंदोलकांना भेटणार!

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजपने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या पोकळ घोषणा केल्या आहेत. केंद्रात आणि राज्यात त्यांचे सरकार असताना ते मराठा समाजाला का आरक्षण देऊ शकत नाहीत? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. मराठा समाजाचे आंदोलन दडपून टाकण्याचा क्रुर प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. मराठा बांधवांवरील लाठीचार्जची घटना निंदनीय असून याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्विकारुन तात्काळ जारीनामा द्यायला हवा अशी आमची मागणी असल्याचे देखील ते म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी