33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयजरांगेंची प्रकृती खालावल्याने महिलेने फोडला हंबरडा, विष पिण्याचा दिला इशारा

जरांगेंची प्रकृती खालावल्याने महिलेने फोडला हंबरडा, विष पिण्याचा दिला इशारा

मनोज जरांगे-पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती ढासळत असून त्यांचे अंग थरथरत आहे. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार करा, अशी मागणी एका महिलेने केली आहे. एवढेच नाही तर जरांगे-पाटील यांच्यावर तातडीने उपचार न केल्यास आपण विष पिऊन आत्महत्या करू, असा इशाराही या महिलेने दिला आहे. सरकार आरक्षण देण्यास जाणूनबुजून विलंब करत आहे. अशात जरांगेंचे काही बरेवाईट झाल्यानंतर मराठ्यांना आरक्षण मिळाले तर काय फायदा, असा सवाल करत सरकारने तातडीने मराठा आरक्षण द्यावे, जरांगेंचा अंत पाहू नये, अशी विनवणी या महिलेने केली आहे.

ही महिला अंतरवाली सराटी गावात जरांगे-पाटील यांना भेटण्यासाठी आली होती. मात्र, जरांगे यांची प्रकृती पाहून तिने हंरबडा फोडला. त्यामुळे आता उपोषण स्थळी वातावरणात तणाव आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपल्यानंतर २५ ऑक्टोबरपासून उपोषणाला सुरुवात केली. आता मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, असा निर्धार जरांगे-पाटील यांनी केला आहे. जरांगे-पाटील यांच्या उपोषणानंतर राज्यात अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. याची झळ दोन दिवसांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पाटील यांनाही बसली आहे. आता तर जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ अनेक गावागावांत कॅन्डल मार्च काढण्यात येत आहेत. काही ठिकाणी आक्रमक मराठा समाज नेत्यांना गावात येण्यापासून रोखत आहेत. मराठा आरक्षणासाठी मराठा समाज दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहे.

कराडमध्ये मराठा समाजाचा मोर्चा

कराडमध्ये हजारोंच्या संख्येने सकल मराठा समाजाने मोर्चा काढला. जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आरक्षणाच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यात महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता.

सरकार कसली वाट पाहतंय? – रोहित पवार

जरांगे-पाटील यांची तब्येत क्षणाक्षणाला खालावत चालल्याने त्यांची सर्वांनाच चिंता वाटतेय. अशा परिस्थितीत सरकार नेमकी कशाची वाट बघतंय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. दुर्दैवाने त्यांच्या जीवाला काही धोका झाला तर खोटेपणाची आणि अहंकाराची गोळी खाऊन आपल्याच धुंदीत असलेल्या सरकारला जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळण्याची वेळ येईल. तशी वेळ येऊ देऊ नका, ही कळकळीची विनंती, असे आवाहन रोहित पवार यांनी सरकारला केले आहे.

हेमंत पाटील यांचा खासदारकीचा राजीनामा

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हिंगोलेचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा पाठवला आहे. नांदेडमध्ये डीनकडून स्वच्छतागृहे साफ करून घेतल्याने खासदार हेमंत पाटील टिकेचे धनी ठरले होते.

हे ही वाचा

मराठा आरक्षण झाले सोपे, १५ हजार कागदपत्रांमुळे आशा पल्लवीत…

आरक्षणाचे गौडबंगाल; रामदास आठवले काय म्हणाले नक्की?

डॉ. अनिलकुमार गायकवाड, स्थापत्यकला क्षेत्रातील ‘विक्रमादित्य’

 

आरक्षणाची घोषणा कधीही… – संजय राठोड

याच पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची घोषण कधीही होऊ शकते, असे वक्तव्य केले आहे. एकीकडे जरांगे-पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू करून आरक्षणासाठी लावलेली जीवाची बाजी आणि यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणतेही ठोस आश्वासन देत नसताना संजय राठोड यांनी वक्तव्य करणे, याला किती महत्त्व द्यायचे, याकडेही लक्ष वेधले जाते आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी