31 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeराजकीयमहाराष्ट्रात या अन् महापुरुषांना शिव्या घाला; जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका

महाराष्ट्रात या अन् महापुरुषांना शिव्या घाला; जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका

राज्यात पुन्हा एकदा बागेश्वर धामचे महंत पंडित धीरेंद्र शास्त्री आणि कालिचरण महाराज यांनी केलेल्या विधानांवरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. साईबाबा हे संत असू शकतात, फकीर असू शकतात पण देव नाही असं वादग्रस्त वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी शिर्डीच्या साईबाबांबाबत केले आहे. या विधानावरून आता राजकारणात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. कोणीही कोल्ह्याची कातडी धारण करून सिंह होऊ शकत नाही. एक कोल्हा एक कोल्हाच राहील, असं धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या या विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सडकून टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत वादग्रस्त विधान करणारे आणि सरकारवर निशाणा साधला आहे. कुणालाही शिव्या घाला महापुरुषांना घाला, श्रद्धा स्थानांना घाला…..असं वातावरण परत मिळणार नाही. यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही याची खात्री आणि शाश्वती आहे. या लवकर या…, असं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटद्वारे म्हटलं आहे.

धीरेंद्र शास्त्री यांच्या जबलपूरमध्ये आयोजित दरबार कार्यक्रमात साईबाबांचा अवमान करण्यात आला. ‘साई बाबा संत असू शकतात. फकिर असू शकतात. पण ते देव होऊ शकत नाही’, असे विधान त्यांनी केले. त्याचप्रमाणे जितके तुम्ही नथुराम गोडसे यांच्याबद्दल वाचणार तेवढे तुम्ही त्यांचे भक्त व्हाल. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींच्या बाबत केले ते योग्य केले. नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता, असे वक्तव्य कालिचरण महाराजांनी केले आहे. बागेश्वर बाबा आणि कालिचरण महाराजांच्या विधानांनंतर पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा : शिर्डी साई बाबा देव नाही! 

महाराष्ट्राच्या संतांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; नाना पटोलेंचे खडे बोल

तुकोबारायांबद्दल गरळ ओकणाऱ्या बागेश्वरबाबत गप्प का? रोहित पवारांचा एकनाथ शिंदेंना संतप्त सवाल

 

Dhirendra shastri, Jitendra Awhad, Jitendra Awad tweet : Come to Maharashtra and insult anyone

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी