27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयजितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक खुलासा,आपल्या राजकीय खूनाचा प्रयत्न करण्यात आला

जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक खुलासा,आपल्या राजकीय खूनाचा प्रयत्न करण्यात आला

टीम लय भारी

मुंबई:- राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड  यांनी केलेल्या गौप्यस्फोटानं राजकारणात  खळबळ उडाली आहे. माझा राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा आव्हाडांनी केला आहे. ठाण्यातील शिवसेनेचे नेते व आव्हाडांमधील राजकीय हेवेदावे जगजाहीर आहेत. आता हा वाद अधिकच चिघळल्याचे आव्हाडांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.(Jitendra Awhad’s shocking revelation)

ठाण्यातल्या वॉर्डरचनेवरुन जितेंद्र आव्हाडांनी शिवसेना नेते आणि ठाण्याच्या आयुक्तांवर हल्लाबोल केला आहे. माझा राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यातील शिवसेना नेत्यांवर केला आहे.

हे सुद्धा वाचा

जितेंद्र आव्हाड यांनी एमएमआरडीएवर कामात घोटाळा केल्याचा केला आरोप

जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोदी – फडणविसांच्या विरोधातही आंदोलन करावे : प्रकाश शेंडगे

माझ्या घरावर मोर्चा येणार; मंत्री आव्हाडांनी ट्वीट करून दिली माहिती

Scrap plan to have consultant for salt pan land: Jitendra Awhad to MMRDA

माझ्या मतदार संघातील वॉर्ड २३ वरुन १८ वर आणले, तर फडणवीसांच्या काळातही एवढा त्रास झाला नाही. तर वॉर्डरचना करताना मुस्लीम द्वेष दिसतोय असाही आरोप ठाणे पालिका आयुक्तांवर आणि शिवसेना नेत्यांवर जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीसंदर्भात ते म्हणाले होते की, इतरांची इच्छा असेल तर सोबत राहू. कुणीही राजकीय मग्रुरी दाखवू नये. शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना समजावं”, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.

आव्हाड म्हणाले होते की, जर इतरांची इच्छा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस हात सोडणार नाही. पण कुठला पक्ष राजकीय मग्रुरीमध्ये आमची सत्ता आहे, आम्ही सत्ता आणू शकतो, आमची सत्ता होती वगैरे सांगत असेल तर मग प्रत्येकाला लढायचे मार्ग मोकळे आहेत. माझी स्थानिक आमदार प्रताप सरनाईक, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की, आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं आणि एक सक्षम आघाडी बनवू. वर्षोनुवर्षे महापालिका पोखरुन खाललेल्या भाजपला घरी बसवावं.

Let's go to Kashmir with Sarathi Holidays to enjoy the beautiful nature

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी