30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयसत्तासंघर्ष : राज्यात घड्याळाचे काटे उलटे फिरविले जाऊ शकतात का? पुन्हा पूर्वीची...

सत्तासंघर्ष : राज्यात घड्याळाचे काटे उलटे फिरविले जाऊ शकतात का? पुन्हा पूर्वीची परिस्थिती येऊ शकते का? 

एकीकडे, शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याची शक्यता असल्याने संभाव्य राजकीय समीकरणांबाबत आडाखे बांधले जात आहेत.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात, राज्यात घड्याळाचे काटे उलटे फिरविले जाऊ शकतात का? पुन्हा पूर्वीची परिस्थिती येऊ शकते का? याबाबत चर्चेला सध्या जोर आला आहे. एकीकडे, शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याची शक्यता असल्याने संभाव्य राजकीय समीकरणांबाबत आडाखे बांधले जात आहेत.

सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान घड्याळाचे काटे उलटे फिरविले जाऊ शकतात का, महाराष्ट्रात पुन्हा पूर्वीची परिस्थिती येऊ शकते का, यावर चर्चा झालेली आहे. त्याविषयी सुप्रीम कोर्टातील मराठी वकिलांची मते जाणून घेऊया.

अॅड. कश्मीरा लांबट
त्यावर मी काही बोलू शकत नाही. पण घटनापीठ जो काही निकाल देईल तो महत्त्वपूर्ण असेल.

अॅड. प्रशांत केंजळे
घड्याळाचे काटे उलटे फिरविले जाऊ शकणे अतिशय अवघड आहे. तशी शक्यता कमी आहे. जवळपास एक वर्षांचा कालावधी मध्ये निघून गेलेला आहे. त्या कालावधीत बरेचसे महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत. कुठल्याही ऑथरिटीने निर्णय दिलेला नसताना सुप्रीम कोर्ट त्यात थेट काहीही करणार नाही. माझा अंदाज तसा आहे. सुप्रीम कोर्ट हे शक्यतोवर विधानसभा अध्यक्षांकडे परत पाठवेल. त्यावर अध्यक्षांनाच निर्णय घ्यावा लागेल.

 

हे सुद्धा वाचा :

  1. महाराष्ट्रातील प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे जाऊ शकते, की सुप्रीम कोर्ट 16 आमदारांना अपात्र ठरवू शकते?
  2. शिंदे सरकार जाणार की राहणार? निकालाबाबत पाच न्यायाधीशात सहमती नसेल तर?
  3. जर न्यायमूर्ती शाह निवृत्त होण्यापूर्वी निकाल आला नाही तर काय?

अॅड. यतीन जगताप
यामध्ये थेट सुप्रीम कोर्ट स्वत: निर्णय घेण्याची शक्यता कमी आहे. माझ्या मते, हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडेच परत पाठविले जाईल. कारण 16 आमदारांच्या अपात्रतेचा जो निर्णय आहे, तो विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. त्यामुळे निर्णय थेट सुप्रीम कोर्टाला घेता येता येणार नाही. तो अधिकार विधानसभा अध्यक्षांकडेच आहे आणि राहील.

या पंधरवड्यात कोणत्याही क्षणी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. हा निकाल माईलस्टोन असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार की जाणार ? या संदर्भात “झी 24 तास” वृत्तवाहिनीचे नवी दिल्लीतील प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी सुप्रीम कोर्टातील मराठी वकीलांशी खास बातचीत केली. अॅड. सिद्धार्थ शिंदे, अॅड. आकाश काकडे, अॅड. कश्मीरा लांबट, अॅड. श्वेतल शेफाल, अॅड. यतीन जगताप, अॅड. प्रशांत केंजळे, अॅड. राज पाटील ही अनेक वर्षे सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारी दिग्गज मंडळी “झी 24 तास”च्या वार्तालापात सहभागी झाली होती.

Maharashtra Politics , Shinde Sena, Shinde Sena MLA Matter, Maharashtra MLA Supreme Court, Maharashtra Situation Restored As It Was

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी