31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयमहाराष्ट्र विकणं यांना चहा विकण्यासारखं वाटलं का -अमोल मिटकरी

महाराष्ट्र विकणं यांना चहा विकण्यासारखं वाटलं का -अमोल मिटकरी

टीम लय भारी
मुंबई : विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू झाले आहे. पहिल्या दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. काही वेळापूर्वीच अजित पवारांना राज्याचा चार्ज दिला तर अधिवेशन संपायच्या आधी 4 दिवसात अजित पवार राज्य विकून टाकतील, अशी खोचक टीका गोपीचंद पडळकरांनी केली होती. (Maharashtra selling feel like selling tea?)

त्यावर आता राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कोणती टीका कोण का करतो? हे सर्वांनाच माहीत आहे. राज्य विकणे म्हणजे ह्यांना चहा विकण्यासारखे वाटेल का? भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी देश विकायला निघाले आहेत, यांनी सगळेच विकले आहे, असा पलटवार राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचं मुंबईत रजिस्टर तर गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने मुलीचं लग्न; स्पष्टीकरण देताना म्हणाले…

आशिष शेलार, तुम्ही गुजराती शिकून घ्या; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शेलारांना टोला!

कृषी कायद्यांचे काय झाले? सगळ्या जनतेला माहिती आहे. गोपीचंद पडळकर, चंद्रकांत पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांवर बोलावे तेवढी त्यांची पातळी नाही, अजित पवार उत्तम प्रशासक आहेत तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कुशल नेतृत्व महाराष्ट्रचे आहे.

त्यामुळे सगळ्यांचं योग्य प्रकारे सहकार्य महाराष्ट्राला लाभलेआहे, अशी टीकाही मिटकरी यांनी केली आहे. परीक्षा घोटाळा रॅकेटमध्ये नागपूर कनेक्शन देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचेल अशी मला शंका आहे, असेही ते म्हणाले आहेत.

NCP : राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती ! भाजपमधील अनेकांचा राष्ट्रवादीत येण्याकडे ‘कल’

ED raids in Mumbai: Company linked to NCP leader Nawab Malik’s son under scanner

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी