31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeराजकीयगांधींनी नुकसान नव्हे, देशावर मोठे उपकार केले

गांधींनी नुकसान नव्हे, देशावर मोठे उपकार केले

इतिहासात होऊन गेलेल्या नेत्यांचे हवे तेवढे व हवे तसे मूल्यमापन करता येतेच अकबर, बाजीराव, नेपोलियन यांच्यासारखे रणवीर असो की स्टालीन, माओ, चर्चिल किंवा गांधी यांच्यासारखे आधुनिक राजकारणी. त्यांच्या कामातल्या भरपूर चुका, उणीवा, दोष कुणीही दाखवू शकतो. एक तर आपण काळाने खूप पुढे आलेलो असतो.त्यामुळें अशा नेत्यांची , दिग्गजांची अभ्यासपूर्ण माहिती असणं फार गरजेचं आहे. 'लय भारी' ने काही दिवसांपूर्वीच प्रकाशित केलेल्या ' गांधी नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलंय का... '' या विशेषांकात ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठ्ये यांचा ''गांधींनी नुकसान नव्हे, देशावर मोठे उपकार केले'' हा लेख गांधींविषयी अनेक विषयावर भाष्य करताना दिसतो. ये लेखात ते काय म्हणतात पाहूया

इतिहासात होऊन गेलेल्या नेत्यांचे हवे तेवढे व हवे तसे मूल्यमापन करता येतेच(Mahatma Gandhi did a great favor to the country, not a loss). अकबर, बाजीराव, नेपोलियन यांच्यासारखे रणवीर असो की स्टालीन, माओ, चर्चिल किंवा गांधी यांच्यासारखे आधुनिक राजकारणी. त्यांच्या कामातल्या भरपूर चुका, उणीवा, दोष कुणीही दाखवू शकतो. एक तर आपण काळाने खूप पुढे आलेलो असतो.त्यामुळें अशा नेत्यांची , दिग्गजांची अभ्यासपूर्ण माहिती असणं फार गरजेचं आहे. ‘लय भारी’ ने काही दिवसांपूर्वीच प्रकाशित केलेल्या ‘ गांधी नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलंय का… ” या विशेषांकात ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठ्ये यांचा ”गांधींनी नुकसान नव्हे, देशावर मोठे उपकार केले” हा लेख गांधींविषयी अनेक विषयावर भाष्य करताना दिसतो. ये लेखात ते काय म्हणतात पाहूया ……
ते म्हणतात , इतिहासात अमुक एक गोष्ट अशी करायला हवी होती असे म्हणणे सोपे असते. भारत पाकिस्तान फाळणीचे उदाहरण घ्या. मोहम्मद अली जिना किमान दहा वर्षे फुफुसाच्या दुखण्याने आजारी होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर अवघ्या एका वर्षात ते मरण पावले. त्यांचा अंत इतका समीप आहे हे जर ठाऊक असते तर ब्रिटिश थांबले असते व फाळणी टळली असती असे माउंटबॅटन नंतर म्हणाला. त्यावर बरीच चर्चा झाली. तेव्हा गांधी नेहरूंनी घाई केली नसती तर फाळणी टळली असती असे अनेक जण सुचवतात. पण एकतर, जिनांच्या आजारपणाविषयी त्यावेळी गांधी व इतरांना कल्पना नव्हती. असली तरी तेव्हाच्या स्थितीत निर्णय घेणे टाळणे शक्य होते का हे ठरवणे कठीण आहे. जिनांच्या नंतर ही मागणी मागे पडली असती हा दावा करण्यालाही ठोस आधार नाही. शिवाय, यामध्ये फाळणी घडवून आणण्या मागच्या ब्रिटिशांच्या डावपेचांकडे यामध्ये पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी