28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeराजकीय'राष्ट्रवादीचे फुटणारे आधीच फुटले, आता कुणी फुटणार नाही'

‘राष्ट्रवादीचे फुटणारे आधीच फुटले, आता कुणी फुटणार नाही’

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून आमदारांना आमिषे दाखवून त्यांना फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही. फुटणारे आधीच फुटले आहेत. आता कुणीही फुटणार नाही. लोकांच्या विश्वासावर आमचे आमदार निवडून आले आहेत. विरोधी पक्षात बसण्याची आमच्या सगळ्या आमदारांची मानसिकता आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

एखादा आमदार फुटला तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना असे सर्व पक्ष एकत्र येऊन त्या आमदाराला फेर निवडणुकीत हरवतील असा आमचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे आमदार फुटीची आम्हाला चिंता नाही, असे पाटील म्हणाले. आमचे 54 आमदार आहेत. त्यामुळे आम्ही विरोधी पक्षातच बसणार आहोत. जनतेचा कौल भाजप व शिवसेनेला मिळालेला आहे. त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करायला हवे. पण शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजप सरकार स्थापन करू शकत नाही. तसे ते स्थापन केले तर टिकू शकणार नाही, अशी स्थिती आहे. भाजप व शिवसेनेमध्ये जे ठरलंय त्यानुसार सत्तावाटप व्हायला हवे. सत्तेत ठरल्यानुसार वाटा मिळत नाही म्हणून शिवसेना भाजपला पाठिंबा देत नाही, असे दिसत आहे. पण हा प्रश्न त्या दोन्ही पक्षांतील आहे. त्यांनी तो सोडवायला हवा, असाही सल्ला जयंत पाटील यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाला शिवसेनेचा विरोध नाही : संजय राऊत

सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील दुपारी राज्यपालांना भेटणार, सत्ता स्थापनेच्या हालचाली

शिवसेना आपल्या आमदारांना ठेवणार ‘लपवून’

शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाची सुधीर मुनगंटीवार गोड बातमी देतील : संजय राऊत

राजकीय बाबींबाबत आज आमची कोणतीही बैठक होणार नाही. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते कामाला लागले आहेत. स्वतः शरद पवार आज चिपळूणमार्गे कोकणात पाहणीसाठी जात आहेत. मी सांगलीला जात असल्याचे पाटील म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी