31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयमहापालिका निवडणुकीसाठी मनसेची रणनिती ठरली, स्वबळावर निवडणूक लढवणार

महापालिका निवडणुकीसाठी मनसेची रणनिती ठरली, स्वबळावर निवडणूक लढवणार

टीम लय भारी

मुंबई: राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली. आगामी महापालिका निवडणुकीत  मनसे कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिल्याचं समोर आलं आहे.( MNS’s strategy for municipal elections is to fight elections)

महापालिका निवडणुकीसाठी मनसेनं स्वबळाचा नारा दिला आहे. एप्रिलमध्ये निवडणुका ग्रहित धरुन कामाला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे भाजप युतीच्या चर्चा होत्या.

हे सुद्धा वाचा

मनसेला धक्का, विदर्भातील नेते अतुल वंदिले राष्ट्रवादीच्या गळाला!

राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट

बऱ्याच वर्षांनी का होईना कुंभकर्णाची झोप मोडली;मराठी पाट्यावरून मनसेचा टोला!

Prepare for BMC polls without thinking about any alliance, Raj Thackeray to MNS workers

आपण एकटे लढण्याची तयारी करावी, असे आदेश मनसे नेत्यांना राज ठाकरेंनी दिले आहेत. आपली स्वबळाची तयारी असली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाल्याचं कळतंय. मनसेच्या आगामी काळात विधानसभा निहाय बैठका आयोजित केल्या जातील. तर, लोकसभा निहाय बैठका राज ठाकरे घेणार आहेत.

राज्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सर्वाधिक प्रतिष्ठेची ठरणार आहे. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप या दोन पक्षांमध्ये मुख्य लढत असेल. पण गेल्या निवडणुकीप्रमाणे ही लढत अटीतटीची होऊन शिवसेना आणि भाजपच्या जागांमध्ये थोडक्या जागांचा फरक असेल तर सत्ता स्थापनेत मनसे हा पक्ष किंगमेकरची भूमिका बजावू शकतो.

मनसे आणि भाजपमधील वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर याबाबत वाटाघाटी सुरु आहेत. भाजप – मनसेची ही युती छुप्या स्वरुपाची असेल, असे सांगितले जात आहे. त्यादृष्टीने मुंबईतील कोणत्या जागा कोणासाठी सोडायच्या, याची चर्चा सुरु असल्याचे समजते. तसेच महापालिकेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष युती होऊ शकली नाही तरी भाजप आणि मनसेमध्ये ‘सहकार्या’चा पॅटर्न आकाराला यावा, यादृष्टीनेही प्रयत्न सुरु आहेत.

या बैठकीला राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आणि रणनिती संदर्भात मनसेची बैठक बोलावण्यात आली. मुंबई , पुणे , पिंपरी चिंचवड , ठाणे आणि नाशिक येथील पक्ष पदाधिकारी मुंबईतील बैठकीला उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी