28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयचर खोदणे सर्वेक्षणाला आचारसंहितेचा फटका

चर खोदणे सर्वेक्षणाला आचारसंहितेचा फटका

शहराची तहान भागविणार्‍या गंगापूर धरणात चर खोदणे सर्वेक्षणासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या असल्या तरी मनपाला या निविदा खुल्या करण्यास आचारसंहितेचा अडथळा आहे. हा विषय नाशिकला पाणी पुरवठा करण्याच्यादृष्टिने महत्वाचा असल्याने निविदा खोलण्यासाठी मनपा प्रशासन जिल्हाधिकार्‍यांची परवानगी घेणार असून तसा पत्रव्यवहार केला आहे. आचारसंहितेत नियमानूसार निविदा प्रक्रिया राबवणे अथवा खुली करता येत नाही. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे स्पेशल केस म्हणून परवानगी घ्यावी लागते.जायकवाडीसाठी गंगापूर व दारणा समूहातून एकूण तीन टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नाशिक महापालिकेने मागणी केलेले ६१०० दलघफू पाणी आरक्षण जलसंपदाने फेटाळत ५३०० दलघफू पाणी मंजूर केले.

शहराची तहान भागविणार्‍या गंगापूर धरणात चर खोदणे< gangapur dam> सर्वेक्षणासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या असल्या तरी मनपाला या निविदा खुल्या करण्यास आचारसंहितेचा अडथळा आहे. हा विषय नाशिकला पाणी पुरवठा करण्याच्यादृष्टिने महत्वाचा असल्याने निविदा खोलण्यासाठी मनपा प्रशासन जिल्हाधिकार्‍यांची परवानगी घेणार असून तसा पत्रव्यवहार केला आहे. आचारसंहितेत नियमानूसार निविदा प्रक्रिया राबवणे अथवा खुली करता येत नाही. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे स्पेशल केस म्हणून परवानगी घ्यावी लागते.जायकवाडीसाठी गंगापूर व दारणा समूहातून एकूण तीन टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नाशिक महापालिकेने मागणी केलेले ६१०० दलघफू पाणी आरक्षण जलसंपदाने फेटाळत ५३०० दलघफू पाणी मंजूर केले. < LokSabha Elections>

३१ जुलैपर्यंत नाशिककरांची तहान भागवायची असेल तर ५८०० दलघफू पाणी आवश्यकता आहे. अन्यथा शहरात पाणी कपात लागू करावी लागेल.यावर तोडगा म्हणून जलसंपदाने मृतसाठ्यातील सहाशे दलघफू पाणी उचलण्याची परवानगी दिली. मात्रधरणाची पातळी ५९८ मीटरच्या खाली गेल्यास धरणाच्या मध्य भागातून जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी चर (इंटेक वेल) खोदावी लागेल. अन्यथा मृतसाठ्यातील पाणी उचलता येणार नाही व शहरात पाणी कपातीचा कटू निर्णय घ्यावा लागू शकतो. त्यामुळे ही परिस्थिती टाळण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने चर खोदण्यापुर्वी सर्वेक्षणासाठी निविदा प्रक्रिया राबवली. मात्र त्याकडे कंपन्यांनी पाठ फिरवल्याने सात दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. मात्र तरी देखील मुदतवाढीच्या अंतिम दिवसापर्यंत एकच निविदा प्राप्त झाली अाहे. त्यामुळे पुन्हा तीन दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान चार कंपन्यांनी सर्वेक्षणासाठी धरणाची पाहणी केली व तीन कंपन्यांनी निविदा भरल्या. मागील १६ मार्चला दुपारी चार वाजता निविदा खोलण्यात येणार होत्या.परंतू त्याच दिवशी दुपारी तीनला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. त्यामुळे निविदा खोलता आली नाही. अन्यथा तो आचारसंहितेचा भंग झाला असता. त्यावर पर्याय म्हणून जिल्हाधिकार्‍यांकडे याबाबत परवागनी घेऊन निविदा उघडली जाणार आहे.

चर खोदण्यास जूनचा मुहूर्त
चर खोदणे सर्वेक्षण निविदा प्रक्रिया व त्याचा अहवाल एप्रिल महिन्यात मनपाला मिळेल. त्यानंतर चर खोदण्यासाठी मे महिन्यात निविदा प्रक्रिया राबवली जाईल. हे सर्व पाहता प्रत्यक्ष जून महिन्यात चर खोदण्यास मुहूर्त लागेल.

चर खोदण्यास जूनचा मुहूर्त
चर खोदणे सर्वेक्षण निविदा प्रक्रिया व त्याचा अहवाल एप्रिल महिन्यात मनपाला मिळेल. त्यानंतर चर खोदण्यासाठी मे महिन्यात निविदा प्रक्रिया राबवली जाईल. हे सर्व पाहता प्रत्यक्ष जून महिन्यात चर खोदण्यास मुहूर्त लागेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी