27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयमुकेश अंबानींच्या जीवावर कोण उठलंय?

मुकेश अंबानींच्या जीवावर कोण उठलंय?

उद्योगपती मुकेश अंबानी कधीही बोलत नाही. ते कायम कामात व्यग्र असतात. एवढे मोठे उद्योगपती असूनही ते कुटुंबात रमतात, कुटुंबाला वेळ देतात. खास सुट्टी काढून कुटुंबासोबत पिकनिकही करतात. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे ते पुन्हा चर्चेत आलेत. मुकेश अंबानी चर्चेत आलेत ते त्यांना आलेल्या धमक्यांमुळे. या धमक्या त्यांना ईमेलवरून आल्या असून चार दिवसांत त्यांना तीन धमक्या आल्या आहेत. या धमक्यांच्या ईमेलमधून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. या संदर्भात पोलिसांनी तपासदेखील सुरू केला आहे. तरीही प्रश्न उपस्थित होतोच की, भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जीवावर कोण उठले आहे?

रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकी येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. तुम्हाला आठवत असेल २५ फेब्रुवारी २०२१ रोजी मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके (जिलेटिनच्या २० कांड्या) ठेवलेली गाडी सापडली होती. त्यानंतर देशात खळबळ उडाली होती. त्याचे गूढ अजून उकललेले नसताना आता चार दिवसांत धमक्यांचे तीन ईमेल त्यांना आले आहेत. या धमक्या देताना त्यांच्याकडून कोट्यवधींची खंडणी मागण्यात आली आहे. या पैशांची तातडीने व्यवस्था न केल्यास हत्या करण्याचीही धमकी देण्यात आली आहे.

मुकेश अंबानी यांना पहिला धमकीचा ईमेल २७ ऑक्टोबर रोजी आला. त्यातून २० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. या धमकीनंतर मुकेश अंबानी यांच्या वतीने गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २८ ऑक्टोबरला मुकेश अंबानी यांना धमकीचा दुसरा ईमेल आला. त्यात तब्बल २०० कोटींची खंडणी मागण्यात आली होती. त्यानंतर ३० ऑक्टोबरला धमकीचा तिसरा ईमेल आला. या ईमेलमधून ४०० कोटींची खंडणी मागण्यात आली आहे. या धमकी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखा आणि सायबर गुन्हे विभागाचे पथक एकत्र काम करत आहे.

या धमक्यांमध्ये आढळलेला समान धागा म्हणजे तिन्ही धमक्या एकाच ईमेलवरून आलेल्या आहेत. हे ईमेल बेल्झियममधून पाठवण्यात आल्याचे कळते. पहिल्या ईमेलमध्य़े ‘जर तुम्ही २० कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला ठार मारू. भारतात आमचे सर्वोत्तम शूटर्स आहेत’ (If you don’t give us Rs 20 crore, we will kill you. We have the best shooters in India) अशी धमकी दिली होती.

गेल्या वर्षी बिहारमधून धमकी

गेल्या वर्षीही मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी आली होती. त्यावेळी मुंबई पोलिसांनी बिहारमधील दरभंगा येथून एकाला अटक केली होती. त्याने सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय उडवण्याची धमकीही दिली होती.

श्रीमंतांची यादी आणि धमकीचा ईमेल

विशेष म्हणजे हरून इंडियाने ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली. यात मुकेश अंबानी यांनाच श्रीमंत भारतीय हे बिरूद मिळाले. देशातील ते सर्वात श्रीमंत असल्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. त्यांची ८ लाख ८ हजार ७०० कोटींची संपत्ती आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर दोन आठवड्यांत मुकेश अंबानींना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी