29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयअशा राजकारणाला आम्ही भिक घालत नाही; नाना पाटोलेंचा भाजपाला टोला

अशा राजकारणाला आम्ही भिक घालत नाही; नाना पाटोलेंचा भाजपाला टोला

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडी पक्षातील तिन्ही पक्षाचे एकमत आहे. भाजप राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारण करू पाहत आहे, त्याला आम्ही भिक घालत नाही असा टोला नाना पाटोलेंनी भाजपाला लगावला आहे (Nana Patole has accused BJP that we do not beg him).

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अजूनही झाली नाही, अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही? यावर नाना पटोले म्हणाले, या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड व्हावी हे तिन्ही पक्षांना वाटत आहे. यासाठी महाविकास आघाडी पक्षातील तिन्ही पक्षांचे एकमत आहे. सध्या कोरोनाचे सर्व नियम पाळून आणि सर्व आमदारांचे कोविड चाचण्यांचे रिपोर्ट आल्याशिवाय निवडणूक करता येणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात जी भूमिका घेतली आहे ती योग्यच आहे त्यात चुकीचे काही नाही. मात्र, यावरून भाजप राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन जे राजकारण करू पाहत आहे, त्याला आम्ही भिक घालत नाही असे नाना पटोले म्हणाले आहेत (Nana Patole has said that he is trying to do politics, we are not begging him).

सर्व पक्षीय चोरांचा शेतकऱ्यांच्या दौलतीवर दरोडा

राज्यपालांच्या पत्राला उद्धव ठाकरेंचे सडेतोड उत्तर

टिळक भवन येथे नाना पटोले प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, विधानसभेचा अध्यक्ष हा काँग्रेस पक्षाचाच होणार, त्यावर महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस पक्ष आपल्या आमदारांची मते जाणून घेऊन पक्षश्रेष्ठींना कळवेल आणि अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर होईल. आघाडीतील तिन्ही पक्षांचा आपापल्या आमदारांवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे संख्याबळ कमी होईल म्हणून व्हिप काढला हा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. व्हीप काढणे ही एक व्यवस्था आहे, त्यात वावगे काही नाही.

राज्याच्या कृषी कायद्यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करता राज्याचा कृषी कायदा घाईघाईने बनवला जाऊ नये. राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करुन फुलप्रुफ कायदा व्हावा ही काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. तीच भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही आहे. केंद्र सरकारने आणलेल्या तीन काळ्या कृषी कायद्यांना आमचा विरोध आहे. केंद्राचे कृषी कायदे राज्यात लागू होणार नाहीत. राज्य सरकार आपला कायदा बनवेल. हा कायदा शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच बनवला जाईल त्यासाठीचा मसुदा जनतेसमोर ठेवून शेतकऱ्यांची व जनतेची मते मागवली जातील आणि त्यातून कायदा बनवला जाईल.

मोदी है तो महंगाई है, रुपाली चाकणकरांचा मोदींना खोचक टोला

Cracks in MVA? Maharashtra Congress chief Nana Patole alleges financial irregularities by Sena’s Subhash Desai

मराठा आरक्षण प्रश्नी पटोले म्हणाले की, मराठा आरक्षण प्रश्नी केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकारलाच आहे हे स्पष्ट झाले आहे. १०२ व्या घटनादुरुस्तीने राज्यांचे अधिकार केंद्रातील मोदी सरकारने काढून घेतलेले आहेत. त्यामुळे राज्याला आरक्षण देण्याचा कोणताच अधिकार राहिलेला नसतानाही फडणवीस सरकारने आरक्षणचा कायदा केला तो सुप्रीम कोर्टात टिकू शकला नाही. सुप्रीम कोर्टाच्या या भूमिकेमुळे भारतीय जनता पक्षाचा खोटारडेपणा उघडा पडला असून त्यांच्याकडे आता सांगण्यासारखे काहीही नाही. आरक्षण संपुष्टात आणणे हा भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव आहे (The ploy of BJP and Rashtriya Swayamsevak Sangh is to end reservation).

भाजपाने मराठा समाजाची तसेच विधानसभेचीही दिशाभूल केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना नसल्याचे अधोरेखीत झाल्याने केंद्र सरकारने मराठा समाजाला न्याय द्यावा. विरोधी पक्षांमध्ये भीती निर्माण व्हावी यासाठीच ईडी, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर भाजप करत आहे. त्यांच्या दहपशाहीला आम्ही भीत नाही. अमित शाह यांच्या मुलाची संपत्तीही भरमसाठ वाढली आहे त्याची चौकशी ईडी का करत नाही. जो भाजपात प्रवेश करतो त्याचे सर्व पाप धुतले जातात आणि जे विरोधी पक्षात आहेत त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला जातो, हे लोकशाहीसाठी घातक आहे, असेही नाना पटोले म्हणाले (Nana Patole also said that Sasemira’s interrogation is dangerous for democracy).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी