31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयनाना पटोलेंचे एक पाऊल मागे; शिवसेनेला गोंजारत भाजपवर साधला निशाणा

नाना पटोलेंचे एक पाऊल मागे; शिवसेनेला गोंजारत भाजपवर साधला निशाणा

टीम लय भारी

मुंबई :- शिवसेना व काँग्रेसमध्ये गेले काही दिवस आरोप प्रत्यारोप सुरू होते. स्वबळावर निवडणूक लढविण्याची आक्रमक भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली होती. या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी जाहीर आव्हान दिले होते. त्यानंतर आता नाना पटोले यांनी नमती भूमिका घेतली आहे (Nana Patole Shiv Sena targets Gonzarat BJP).

पटोले यांनी शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपवर परखड शब्दांत हल्लाबोल केला आहे. राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे सरकार भक्कम आहे. सरकारच्या कामगिरीवर जनताही समाधानी आहे, अशी सबुरीची भावना नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे (Nana Patole has expressed such a feeling of patience).

Video : गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर पुन्हा जहरी टीका, ‘बिनबुडाच्या विचारसरणीचे चाणक्य’ अशी केली संभावना

रोहित पवार – देवेंद्र फडणवीस आले आमने सामने

सत्ता नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेला भाजपा सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून राज्यातील महाविका आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रातूनही त्यांना केंद्रीय तपास यंत्रणा कसा त्रास देत आहेत हे स्पष्ट होत आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे (Shiv Sena MLA Pratap Saranaik’s letter also shows how the Central Investigation Agency is harassing him, said Nana Patole).

राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे भाजपाचे आतापर्यंतचे सर्व प्रयत्न फेल गेले असून आताही त्यांचा कुटील डाव यशस्वी होणार नाही. सरकार पाच वर्षे चालेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Nana Patole Shiv Sena targeted Gonzarat BJP
महाविकास आघाडी सरकार

Video : योगाचा 25 वर्षांपासून प्रसार करणाऱ्या विणा मालडीकर

‘Sonia ji had agreed to join MVA for one reason’: Nana Patole on alliance with Sena

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की,  भाजपा केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून सुरुवातीपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्रास देत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात वाढला, त्याच शिवसेनेला भाजपा आता त्रास देत आहे,  हा भाजपाचा कृतघ्नपणा आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपाला पाहवत नसून त्यांची खूर्ची ओढण्याचा प्रयत्न ते करत आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपाचे नेते सरकार अस्थिर करण्यासाठी आटापीटा करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा या फक्त विरोधी पक्षांच्या लोकांवरच कारवाई करत आहेत. दिल्लीतील राजकीय बॉसच्या इशाऱ्याने विरोधकांवर दबाव आणण्याचे काम ते करत आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांना दिल्या जात असलेल्या त्रासाला पत्रातून वाचा फोडली आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधकांना कसा त्रास दिला जातो हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या यांच्या बोलण्यातून वारंवार उघड झाले आहे.

‘Sonia Gandhi had put forth only one stand to be part of MVA’: Nana Patole amid Congress-Sena rift

महाराष्ट्रातील सत्तेपासून वंचित राहिल्याने भाजपा मागील दीड वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम पद्धतशिरपणे करत आहे. विरोधी पक्षाचे सरकार अस्थिर करण्याचे, विरोधांचा आवाज दाबण्याचे प्रकार सुरु आहेत. परंतु या दबावतंत्रामुळे भाजपाचे सत्तेचे दिवास्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून कोणत्याही दबावाला हे सरकार बळी पडणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले (Nana Patole also said that this government will not fall prey to any pressure as it stands firmly behind Chief Minister Uddhav Thackeray).

 

Nana Patole Shiv Sena targeted Gonzarat BJP
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि नाना पटोले

पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची युती होणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. भारतीय जनता पक्षाविरोधात कोणतीही आघाडी उभी करायची असेल तर ती काँग्रेस पक्षाशिवाय होणे शक्य नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी